झी मराठी वाहिनीवरील “येऊ कशी तशी मी नांदायला” ही मालिका सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. काही महिन्यापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेतील प्रत्येक कलाकारांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसून येत आहे. आज आपण या मालिकेचा मुख्य अभिनेता ओम म्हणजेच शाल्व किंजावडेकर खऱ्या गर्लफ्रेंड बद्दल जाणून घेणार आहोत.

Shalva real girl friend name

येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकेद्वारे शाल्व यांने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्याने साकारलेली ओमची भूमिका पाहून अनेकांनी मराठी इंडस्ट्रीला नवीन चॉकलेट बॉय मिळाला म्हटले. सध्या मालिकेत स्वीटू सोबत लग्न होणार असले तरी शाल्वची खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंड ही दिसायला खूपच सुंदर असून ती एक बिझनेसमन आहे.

Shalva real girl friend name

शाल्वच्या खऱ्या आयुष्यातील गर्लफ्रेंडचे नाव श्रेया डफलापुरकर हे आहे. श्रेया ही जरी अभिनेत्री नसली तरी ती कलाक्षेत्रासंबंधी महत्वाची कामे करते. “तलम” या कपड्याच्या ब्रँडची को फाऊंडर आहे. मराठी अभिनय क्षेत्रात अनेक कलाकारांची कपडे श्रेयाच्या या ब्रँड मधून पुरविले जातात. म्हणूनच श्रेया ही देखील एखाद्या सेलिब्रिटी इतकीच लोकप्रिय आहे.

Shalva real girl friend name

शाल्व व श्रेया हे दोघे खूप अगोदर पासून एकमेकांना डेट करीत आहेत. दोघांनी नेहमीच एकमेकांसोबतच्या फोटोज् सोशल मीडियावर अपलोड केल्या आहेत. मालिकेत ओम जितके स्वीटू वर प्रेम करताना दिसून येतो, तितकेच तो खऱ्या आयुष्यात श्रेया वर प्रेम करताना दिसतो. सध्या “येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेत ओम व स्विटूच्या लग्नाची तयारी चालू झालेली पाहायला मिळत आहे. या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने झी मराठीच्या सध्या चालू असलेल्या मलिकांपैकी ही एकमेव मालिका बंद होणार नाही.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *