लग्न म्हणजेच 7 जन्मासाठी एकत्र राहण्याचे वचन घेऊन 2 जीवांचे झालेले मिलन होय. लग्न करण्यापूर्वी प्रत्येकजण आपल्या होणाऱ्या पती पत्नी बद्दल काही स्वप्न पाहत असतात. तसेच, लग्न व लग्नातील सर्व विधी आपल्या मनासारखे व्हावे अनेकजण ठरवीत असतात. आता लग्नातील एका मुलीचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात ती मुलगी आवडीचे गाणे लागले नाही म्हणून रुसल्याचे दिसून येत आहे.

 

व्हायरल व्हिडिओ मधील मुलीचे नाव शिवानी पिप्पल असून ती दिल्ली येथे राहते. शिवानी हीचा विवाह साजन आनंद या मुलासोबत होणार होता. या दोघांच्या लग्नाची सर्व तयारी झाली होती. शिवानी लग्नमंडपात जात असताना तिला तिच्या आवडीचे गाणे तिथे वाजवायला पाहिजे होते. आवडीच्या गाण्यासाठी ती तिथेच हट्ट करीत राहिली व पुढे जाण्यास नकार दिला.

शिवानीला लग्नात एन्ट्री करताना कैलास यांनी गायलेले “पिया घर आवेंगे” हे गाणे वाजवायचे होते. ते गाणे चालू झल्यासच शिवानी नंतर मांडवाकडे निघाली. पण त्यापूर्वी शिवानीने नातेवाईक व मित्र मंडळीला दम दिल्याचे देखील दिसून आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून हेच गाणे का हवे होते त्याबद्दल शिवानीने सांगितले.

Shivani marriage viral

शिवानी ही एक मेकअप आर्टिस्ट असून तिने स्वतःच तिचा लग्नातील मेकअप केला होता. ती म्हणाली, “ते गाणे माझ्यासाठी फक्त गाणेच नसून एक फिलिंग आहे. कारण मी आणि माझ्या पार्टनरने लग्नापूर्वी ते गाणे वाजेल तेंव्हा आम्ही कसे दिसणार हे स्वप्न आम्ही पाहिले होत. मी सर्व नवरींना सांगू इच्छिते की तुम्ही लोक काय म्हणतील म्हणून तुमचा मोठा दिवस खराब करू नका.”

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *