झी मराठी वाहिनीने सध्या जून्या मालिका बंद करून नवीन मलिकां प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. नवीन 5 मालिकांमध्ये “ती परत येती आलीये” ही मालिका 16 ऑगस्ट पासून सुरू होणार असून या मालिकेच्या प्रोमोची खूप चर्चा होताना दिसून येत आहे. ज्येष्ठ अभिनेते विजय कदम या मालिकेत दिसणार असल्याने या मालिकेबाबतीत प्रेक्षकांच्या मनात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ti parat aaliye actress news

देवमाणूस या मालिकेच्या ऐवजी “ती परत आलीये” ही मालिका 16 ऑगस्ट पासून रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांसमोर आले असून त्या प्रोमोनुसार ही मालिका भयावह असल्याचे दिसत आहे. या मालिकेचे प्रोमो आले असले तरी या मालिकेत नक्की कोणती अभिनेत्री असणार हे मात्र गुलदस्त्यात ठेवण्यात आले होते.

Ti parat aaliye actress news

“ती परत आलीये” या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेत्री “कुंजिका काळविंट” ही दिसून येणार आहे. एक निर्णय या चित्रपटातून झळकलेली कुंजिका बऱ्याच दिवसानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येऊन गेलेल्या स्वामीनी या मालिकेत कुंजिकाने आनंदी हे पात्र उत्तमरीत्या साकारले होते. मला थ्रीलर गोष्टी खूप आवडतात, त्यामुळे या मालिकेत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचे स्वतः कूंजिकाने सांगितले.

Ti parat aaliye actress news

या मालिकेमुळे विजय कदम यांच्यासारख्या सोबत काम करण्याची संधी मिळतेय, असे देखील कुंजिका सांगितले. ती परत आलीये या मालिकेत विजय कदम हे बाबुराव तांडेल हे पात्र साकारताना दिसतील. झी मराठी वाहिनीवर आता “ती परत आलीये” व “रात्रीस खेळ चाले-३” अशा दोन रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हि एक मेजवानी असणार आहे.

Ti parat aaliye actress news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *