सामाजिक कार्यकर्ता म्हणून सर्वज्ञात असणाऱ्या अक्षय बोऱ्हाडे याच्या अडचणी वाढल्या आहेत. 2 दिवसांपूर्वीच अक्षय बोऱ्हाडे याच्यावर जुन्नरचे माजी नगरसेवक व शहा एचपी गॅसचे वितरक रुपेश शहा यांना खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणामुळे अक्षय अडचणीत आला होता. आता चक्क अक्षय वर त्याच्या घरातूनच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर पोलीस ठाण्यात अक्षय वर खंडणीचा गुन्हा दाखल असतानाच आता त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. स्वतः सोशल मीडियावर लाईव्ह येऊन रुपाली बोऱ्हाडे यांनी अक्षय आरोप केले आहेत. रुपाली यांच्या म्हणण्यानुसार, “अक्षय, त्याची आई सविता बोऱ्हाडे, दीर अनिकेत बोऱ्हाडे यांनी माझा खूप छळ केला आहे. सासरच्यांनी मला लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, वेळोवेळी धमक्या देऊन मानसिक त्रास दिला.”

Akshay borhade

 

पत्नीच्या या आरोपानंतर शिवऋण संस्थेचा अध्यक्ष अक्षय बोऱ्हाडे हा चांगलाच पेचात सापडला आहे. तसेच, शिवऋण संस्थेत येणार पैसा हा स्वतःच्या चैनी साठी वापरतात असा देखील आरोप अक्षयच्या पत्नीने केला आहे. रुपालीने अक्षय व त्याच्या कुटुंबावर जुन्नर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी हे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन अनेक कलम अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

Akshay borhade
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *