सर्व मालिकांनी निरोप घेतल्यानंतर “येऊ कशी तशी मी नांदायला” ही एकमेव जूनी मालिका झी मराठी वाहिनीने पुढे सुरू ठेवली. कारण बंद झालेल्या मालिकांपेक्षा ही मालिका जास्तच लोकप्रिय होती. परंतु, या मालिकेत स्वीटूचे लग्न ओम सोबत न लावता मोहित सोबत झालेलं दाखविल्याने फॅन्सच्या पदरी निराशाच पडली.

Anvita faltankar latest news

या मालिकेत ओमची भूमिका अभिनेता शाल्व किंजावडेकर व स्वीटूची भूमिका अन्विता फलटणकर याने साकारली आहे. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूपच आवडत असते. परंतु, मालिकेत दोघांमधील वाढलेला दुरावा हे प्रेक्षकांच्या पचनी न पडणारे आहे. स्वीटूची भूमिका साकारणारी अण्विता सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते व तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

 

अन्विताचा हा हटके अंदाजातील व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. ती नेहमीच तिच्या रील्स व्हिडिओ इंस्टाग्राम वर पोस्ट करीत असते. अभिनयासोबतच अन्विताला डान्सची खूप आवड असून ती डान्स व्हिडिओ देखील पोस्ट करताना दिसून येते. मालिकेत गोड असणारी स्वीटू ही खऱ्या आयुष्यात देखील तितकीच गोड आहे.

अन्विता ही यापूर्वी आपल्याला टाईमपास या लोकप्रिय चित्रपटातून सर्वप्रथम दिसून आली होती. त्या चित्रपटातील तिचा “चंदा” हे पात्र देखील प्रेक्षकांना खूप आवडले होते. आता येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत स्वीटू आणि ओम पुन्हा एकत्र येतील का याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

Anvita faltankar latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *