दरवर्षी प्रमाणे कोरोना काळातही लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी यावर्षीही भाविक भक्तांनी कसलीच कसर सोडली नाही. आपण अनेकदा अशा घटना पाहिल्या असतील की जिथे मुस्लिम धर्मातील काही कुटुंब गणरायाचे मनोभावे घरात आगमन करतात. आता एका मुस्लिम अभिनेत्रीने गणपती सोबतची फोटो पोस्ट केल्याने तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे.

Arshi khan latest news
बिग बॉस फेम अभिनेत्री अर्शी खान हीने तिच्या मित्राच्या घरातील गणपती सोबतचा एक फोटो पोस्ट करीत फॅन्स ना शुभेच्छा दिल्या. तिने तिच्या मित्राच्या घरातील गणपती सोबत हा फोटो काढला होता. अनेकांना वाटले की अर्शीने तिच्या घरी गणपती बसविला. त्यामुळे काही मुस्लिम धर्मातील लोकांनी “तू मुस्लिम असून गणपती कसे बसविली”, “लानत आहे तुझ्यावर” अशा शब्दात अर्शीला ट्रोल करण्यात आले.

Arshi khan latest news
अर्शी खानने नंतर व्हिडिओ पोस्ट करून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच फटकारले. “मी हे सुंदर आसामी लुक घेऊन माझ्या मित्राच्या घरी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी गेले होते. तुम्हाला आवडेल म्हणून मला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करावी वाटली. पण घरी येऊन पाहिले तर मला कमेंट मध्ये शिव्या दिसल्या. जो पण माझ्या कमेंट मधून हिंदू मुस्लिम करीत आहे ते निघून जावा इथून.”

“मला अभिमान आहे मी मुस्लिम आहे त्याचा. परंतु त्या सोबत मला भारतीय असल्याचा देखील अभिमान आहे. त्यामुळे मला जो पण सण साजरे करावे वाटेल ते मी साजरे करणार आणि प्रत्येक सणाच्या शुभेच्छा देणार” असे शब्दात अर्शीने ट्रोलर्सना फटकारले. अर्शी सारखेच सैफ अली खान, सलमान खान यांनी देखील त्यांच्या घरी दरवर्षी प्रमाणे गणपती बसविले.

Arshi khan latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *