टेलिव्हिजन वरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उलटा चष्मा मधील टप्पू व बबिता या दोघात प्रेम असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होताना दिसून येत होत्या. राज अनादकट(टप्पु) पेक्षा मुनमुन दत्त(बबिता) तब्बल 9 वर्षाने मोठी असल्याने हा विषय अधिकच चर्चेत आला. या सर्व गोष्टींवर आता मूनमूनने मौन सोडले आहे.

Babita latest news

एका नामांकित वृत्तपत्राने या दोघांत प्रेमसंबंध असल्याचे सांगून टाकले. त्यानंतर अनेक मीडिया वाल्यांनी हीच बातमी प्रसारित केली. त्यावर बोलताना मुनमुन म्हणाली, “मीडिया वाल्यांनो तुम्हाला एखाद्याच्या खाजगी आयुष्याबद्दल आणि तेही त्यांच्या संमतीशिवाय अशा काल्पनिक गोष्टी प्रकाशित करण्याचे स्वातंत्र्य कोणी दिले आहे? या वाईट वर्तनामुळे समोरच्या व्यक्तीच्या प्रतिमेला होणाऱ्या नुकसानास तुम्ही जबाबदार राहाल का?”

Babita latest news

पुढे मुनमुन म्हणाली, “ज्या स्त्रीने तिचा मुलगा गमावला, TRP साठी तुम्ही त्यालाही सोडत नाही. त्यांचे आयुष्य उध्वस्त करण्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकता का ?? नसेल तर, तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे. सामान्य लोकांकडून माझ्या खूप अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी ज्या प्रकारे कमेंट सेक्शन मध्ये घाण पसरविली, ते खूप वाईट आहे. सुशिक्षित लोकांनी पण ही कामे केली.”

Babita latest news

“13 वर्षापासून मी सर्वांचे मनोरंजन करीत आले. परंतु, तुम्हाला 13 मिनिट पण लागले नाहीत माझी इमेज खराब करायला. तुम्हा लोकांचा मजाक दुसऱ्यांसाठी मानसिक रित्या त्रासदायक ठरू शकतो. आज मला स्वतःला भारताची मुलगी बोलायला लाज वाटत आहे” अशा शब्दात मुनमुनने पसरलेल्या अफवांवर आपले मत व्यक्त केले. दुसरीकडे राजने देखील बेजबाबदार मीडियाची दखल घेत या सर्व अफवा असल्याचे सांगितले.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *