बिग बॉस या हिंदी रिॲलिटी शोच्या अभूतपूर्व यशानंतर कलर्स मराठी वाहिनीने हा शो मराठी मध्ये चालू करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य ठरवीत बिग बॉस मराठी या शो ने पहिले 2 सीझन यशस्वीरीत्या पार पाडले. आता 19 सप्टेंबर 2021 पासून बिग बॉस मराठीचे तिसरे सीझन सुरू झाले असून या सीझनमध्ये कोणते सदस्य दाखल झाले आहेत, त्याची यादी आपण पाहुयात.

 

1. सोनाली पाटील
बिग बॉस मराठी 3च्या सदस्यांच्या यादीत पहिले नाव आहे. सोनाली पाटील हीने देवमाणूस मालिकेत सरकारी वकील आर्या देशमुख हे पात्र साकारले होते.

2. विशाल निकम

बिग बॉस मराठीच्या घरात प्रवेश करणारा दुसरा सदस्य अभिनेता विशाल निकम हा आहे. विशालने नुकतीच स्टार प्रवाह वाहिनीवर येऊन गेलेली दख्खनचा राजा जोतिबा मालिकेत त्याने मुख्य भूमिका साकारली होती.

Big boss marathi contestant list 2021

3. स्नेहा वाघ 

बिग बॉस मराठीच्या घरात एन्ट्री करणारी तिसरी सदस्य अभिनेत्री स्नेहा वाघ ही आहे. अनेक हिंदी मालिकेतून दिसून आलेली स्नेहा ने मराठी शो मधून पुनरागमन केले आहे.

4. उत्कर्ष शिंदे 

शिंदे घराण्याचा मराठी संगीत क्षेत्रात महत्वपूर्ण वाटा आहे. आता त्याच घराण्यातील गायक उत्कर्ष शिंदे हा बिग बॉस मराठी मद्ये दिसणार आहे.

Big boss marathi contestant list 2021

5. मीरा जगन्नाथ 

“येऊ कशी तशी मी नांदायला” मालिकेत मोमोची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीरा जगन्नाथ ही बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात दिसून येणार आहे.

6. तृप्ती देसाई 

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या बिग बॉस मराठी 3 च्या सत्रात आल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्या शो मध्ये कुठपर्यंत पुढे जातील हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Big boss marathi contestant list 2021

7. अविष्कार दार्व्हेकर 

किरण कुलकर्णी vs किरण कुलकर्णी अशा काही चित्रपटातून व मालिकांमधून दिसून आलेल्या अभिनेता अविष्कार हा बिग बॉस मध्ये दिसून येणार आहे.

8. सुरेखा कुडची 

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात अनेक मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाने सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या अभिनेत्री सुरेखा कुडची या देखील दिसून येणार आहेत.

Big boss marathi contestant list 2021

9. विकास पाटील 

मराठी चित्रपट व मालिकांमध्ये लोकप्रियता मिळवणारा अभिनेता विकास पाटील हा देखील या सिझन मध्ये दिसून येणार आहे.

10. गायत्री दातार

तुला पाहते रे मालिकेतून अल्पावधीतच लोकप्रिय झालेली अभिनेत्री गायत्री दातार ही देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहे. या सीझन मधील ती सगळ्यात छोटी सदस्य असणार आहे.

Big boss marathi contestant list 2021

11. शिवलिला पाटील

आपल्या सुंदर वाणीने समाजाचे प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकार शिवलिला पाटील या देखील आता बिग बॉसच्या घरात दिसून येतील.

12. जय दुधाने 
स्पिल्ट्सविला या शो मध्ये दिसून आलेला मराठी अभिनेता जय दुधाने हा बिग बॉस मराठी 3 या शो चा 12 सदस्य असणार आहे.

Big boss marathi contestant list 2021

13. मीनल शहा
“रोडीज” या शो मध्ये दिसून आलेली अभिनेत्री मीनल शहा ही देखील बिग मराठीच्या तिसऱ्या पर्वात दिसून येणार आहे.

14. अक्षय वाघमारे

पिळदार शरीरयष्टीने युवा पिढीचे आकर्षण ठरणारा अभिनेता अक्षय वाघमारे हा देखील या शोचा भाग असणार आहे.

15.संतोष चौधरी

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात संतोष चौधरी हा गायक दिसून येणार आहे. आगरी कोळी गाण्यासाठी संतोष लोकप्रिय आहे.

Big boss marathi contestant list 2021

माहिती आवडल्यास share करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *