श्रावण महिन्यापासून महाराष्ट्रात अनेक सण सोहळ्याला सुरुवात होते. श्रावण संपताच प्रतीक्षा असते ते गौरी गणपतीच्या सणाची. संपूर्ण राज्यात गौराईचा सण धूमधडाक्यात साजरा केला जातो. प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने गौरीची स्थापना केली जाते. राज्यात असे एक कुटुंब आहे जिथे एक महिला स्वतःच्या 2 सूनांना गौरी म्हणून बसविले जाते.

Gauri ganpati special

वाशीम जिल्ह्यातील येथील एक महिला चक्क त्यांच्या 2 सूनांना गौरीचा दर्जा देत पूजा करतात. सिंधुबाई सोनुने नामक या महिला समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत गौरीच्या ऐवजी सूनानांच बसवितात. सिंधुताई यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे राज्यभरात त्यांचे कौतुक होत असते. या दोन्ही सूनांची त्या 3 दिवस पूजा करून गौरी सण साजरा केला जातो.

मूर्ती स्वरूपात सर्वजण गौरीचे पूजन करतात, परंतु, सिंधुताई या जिवंत चालत्या बोलत्या महालक्ष्मी घरात ठेवून सर्व विधी पार करतात. हे गौरी पूजन सोहळा पाहण्यासाठी नागरिक एकच गर्दी करताना दिसतात. सासू आणि सुना यांच्या मधील सलोखा, प्रेम आणि जिव्हाळा कायम राहावा असा आपला उद्देश असल्याचे सिंधुबाई सोनुने म्हणतात. सिंधुताईच्या या उपक्रमामुळे संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Gauri ganpati special

गौरीच्या सणाला आपण नाना प्रकारच्या सजावटी झालेल्या आपण पाहतो. कोणी गौराईला वेगवेगळ्या पद्धतीने सजवितात तर कोणी वेगवेगळे सजावटी करताना दिसतात. परंतु, सिंधूताईंच्या या उपक्रमामुळे गौरीचा सणाला नावीन्य आले आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *