गेल्या काही काळात अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांचे निधन झाल्याची वार्ता ऐकावयास मिळाल्या. आता मराठी अभिनय क्षेत्रातून एक दुःखद घटना समोर आली आहे. गोव्यात एका कार अपघातात एक नवोदित अभिनेत्रीचे निधन झाल्याची वाईट बातमी समोर आली आहे. यामुळे महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Ishwar deshpande death news

सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी पहाटे बागा कलंगुट परिसरात एक चारचाकी पुलावरून खाली कोसळली. या गाडी मध्ये पुण्यात राहणारी अभिनेत्री ईश्वरी देशपांडे व तिचा मित्र शुभम देडगे हे दोघे होते. गाडीचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. गाडी जेंव्हा पाण्यात कोसळली तेंव्हा गाडीचा सेंट्रल लॉक झाल्याने दोघांना गाडीबाहेर पडता आले नाही.

ईश्वरी व शुभम या दोघांच्या नाका तोंडात पाणी गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. ही घटना ऐकून त्यांच्या मित्र परिवाराला धक्का बसला असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. ईश्वरी ही नवोदित अभिनेत्री असून तिने एका हिंदी व एका मराठी चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे. त्यामुळे तिच्या जाण्याने एका युवा अभिनेत्री मराठी सिनेसृष्टीने गमावली आहे.

Ishwar deshpande death news

ईश्वरी व शुभम हे दोघे खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. दोघे पुढच्या महिन्यात साखरपुडा देखील करणार होते. परंतु, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. ईश्वरी हिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिच्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी ही दुर्घटना घडली.

Ishwar deshpande death news

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *