गेल्या काही काळात अनेक मराठी सेलिब्रिटींच्या घरी छोट्या पाहण्याचे आगमन झालेले आपण पाहिलं. बॉलिवूड सहित काही मराठी कलाकारांच्या घरातून देखील बाळाची बातमी आली. शशांक केतकर, धनश्री काडगावकर, संकर्षण कऱ्हाडे या कलाकारांना पालकत्व प्राप्त झाले. आता मराठी अभिनय क्षेत्रातील एका जोडीच्या घरी लवकरच बाळाचे आगमन होणार आहे.

Khushboo tawade latest news

देवयानी मालिकेतून प्रसिध्दी मिळविणारा अभिनेता संग्राम साळवी व त्याची पत्नी अभिनेत्री खुशबू तावडे यांनी आज पोस्ट करीत फॅन्सना बाळाचे आगमन होणार असल्याचे फॅन्सना सांगितले. आज खुशबूचा वाढदिवस असल्याने तिने हि आनंदाची बातमी फॅन्स सोबत शेयर केली. या दोघांचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील झाला आहे. संग्राम व खुशबू यांचा विवाह 5 मार्च 2018 रोजी झाला होता.

 

ही आनंदाची बातमी शेयर करताच या दोघांना मराठी कलाकारांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे कमेंट करून म्हणाली, “शेवटी गुपित उघड झाले आहे. आता आम्ही यावर उघडपणे बोलू शकतो. दोघांना शुभेच्छा”. तसेच, श्रेया बुगडे, सुयश टिळक, हृता दुर्गुले, तेजस्विनी पंडित या सर्वांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

“आम्ही दोघी” या मराठी मालिकेत दिसून आलेल्या अभिनेत्री खुशबू तावडे हीने नंतर तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत काम केले होते. पोपटलालच्या आयुष्यात येऊन गेलेल्या बुलबुलचे पात्र तिने साकारली होती. तसेच संग्राम साळवी याने देवयानी मालिकेसोबत सरस्वती सारख्या काही मालिकेत काम केले आहे. खुशबूची बहीण अभिनेत्री तीतीक्षा तावडे हीने देखील या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Sangram salvi good news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *