मागील वर्षभरात मराठी मालिकांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील सर्वच मालिकांचे वर्चस्व असल्याचे दिसून आले. आई कुठे काय करते, मुलगी झाली हो, सुख म्हणजे नक्की काय असतं?, रंग माझा वेगळा, फुलाला सुगंध मातीचा, सांग तू आहेस का अशा काही मालिकांनी त्या काळात स्टार प्रवाह वाहिनीला आघाडीवर नेऊन ठेवले. परंतु, येत्या काही दिवसात यापैकी एक मालिका निरोप घेताना दिसणार आहे.

काही मराठी मालिकांमध्ये सध्या अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका “सांग तू आहेस का?” ही मालिका बंद होणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. सध्या ही मालिका निर्णायक वळणावर येऊन पोहचली असून येणाऱ्या काही दिवसात ही मालिका निरोप घेणार आहे. स्वराजसमोर त्याची पत्नी वैभवीच्या हत्तेचे गूढ समोर आले आहे.

Latest Marathi serial news
“सांग तू आहेस का?” मालिकेत नुकतेच मृत वैभवीची हत्या ही सुलक्षणा हीने केली आहे, हे सत्य स्वराजसमोर आलेले पाहायला मिळाले. पत्नीचे अचानक निधन झाल्यानंतर स्वराजला त्याची पत्नी सोबत असल्याचा भास होत होता. डॉक्टर वैभवीने मृत वैभवीच्या मृत्यूचे गूढ उलगडण्यासाठी स्वराजची संपूर्ण मदत केली.

Latest Marathi serial news

प्रेक्षकांना वैभवी आणि स्वराज या दोघांमधील केमिस्ट्री आवडली होती. ही मालिका ‘आ क्षणा आ नंतरा’ या कन्नड मालिकेचा हा मराठी रिमेक करण्यात आला आहे. यामध्ये सिद्धार्थ चांदेकरने या अभिनेत्याने स्वराजची भूमिका साकारली, अभिनेत्री शिवानी रांगोळे हीने वैभवीची भूमिका साकारली, तर सानिया चौधरीने सिद्धार्थच्या पत्नीची भूमिका साकारली होती. ही मालिका निरोप घेणार असल्याने फॅन्स मध्ये नाराजी पसरली आहे.

Latest Marathi serial news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *