पोलिस प्रशासनाकडून वारंवार जनेतेला जागरूक करून जनतेला अनोळखी व्यक्ती पासून सावध राहण्याचे आवाहन केले जाते. सार्वजनिक ठिकाणी असो किंव्हा घरी असो लोकांनी अनोळखी व्यक्ती पासून सावधानता बाळगायला हवी. कारण अशा व्यक्ती कसे असतात याचा अंदाज लावता येत नसतो.

Latest marathi viral video

आपण अनेकदा ऐकलं आहे की एखादा पुरुष व एखादी महिला व्यक्ती घरी काही वस्तू विकण्यासाठी किंव्हा भिक्षा मागत येते व नंतर चोरी, अपहरण असे गुन्हे करून जातात. असे गुन्हे घडू नये म्हणून लोकांनी सावधानता बाळगायला हवी असते. परंतु, असे गुन्हेगार दिमाखाने गुन्हे करतातच. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे.

 

सदरील व्हिडिओ मध्ये एक महिला काहीतरी सामान घेऊन एका घरासमोर आली आहे. घरातील महिला दार उघडते व ती वस्तू घेण्यास नकार देते. त्यावेळी तिच्या मागे तिचे बाळ खेळताना दिसून येत आहे. वस्तू विकणारी महिला पाण्याची बॉटल समोर करून तहान लागल्याचे सांगते. घरातील महिला तिच्या लहान बाळाला तिथेच सोडून पाणी आणायला किचन मध्ये जाते. तितक्यात ती महिला बाळाचे अपहरण केल्याचे दिसून आले.

Latest marathi viral video

या व्हिडिओ बाबतीत सत्य माहिती तपासली असता ही सत्य घटना नसून लोकांना जागरूक करण्यासाठी बनविण्यात आलेली एक शॉर्ट फिल्म आहे. समाजामध्ये होणारे गुन्हे कमी करण्यासाठी व घरातील महिलांनी अशा अनोळखी व्यक्तींना घरात घेऊ नये, याच साठी हा व्हिडिओ बनविला आहे. त्यामुळे महिलांनी या व्हिडिओ मधून काहीतरी बोध घ्यायला हवा.

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेयर करायला विसरु नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *