आपण अनेकदा पाहतो की सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर त्या व्हिडिओ मधील व्यक्ती रातोरात प्रसिद्ध होत असतात. भारतात अशा प्रकारे आत्तापर्यंत अनेकांना नेटकऱ्यानी स्टार बनविले आहे. आता एका वयस्कर आज्जीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ मध्ये आज्जी डान्स करताना दिसून येत आहेत.

Old lady dance video

सदरील व्हिडिओ हा एका हळदी समारंभातील मधील असल्याचे समजते. जवळपास 80 वयाच्या दिसणाऱ्या आज्जीने असा डान्स केला की तिथे उपस्थित सर्व लोकांनी भरभरून कौतुक केले. या आज्जीने “वल्लव रे नाखवा” हे गाणे लावायला सांगितले व त्यांनी त्यावर ताल धरला. आजीच्या डान्सचा हाच तो व्हिडिओ

हा व्हिडिओ जुना असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाल रंगाची नऊवारी साडी घालून आज्जी मनसोक्त थिरकताना दिसून येत आहेत. गाण्यातील प्रत्येक शब्दाप्रमाणे आज्जी जशास तसे नाचलेल्या पाहायला मिळाल्या. त्यांचा डान्स पाहून जणू त्यांनी हा डान्स कोरियोग्राफ केला असावा असेच वाटत आहे.

Old lady dance video

आपण अनेकदा लग्न समारंभात लोकांना बेधुंद नाचताना पाहत असतो. ज्यांना जसे नाचावे वाटते तसे लोक नाचत असतात. या आज्जीनी देखील तसेच मनसोक्त नाचत कार्यक्रमात ऊर्जा निर्माण केली. आज्जीचा हा व्हिडिओ लोकांकडून शेयर होताना पाहायला मिळत आहे.

Old lady dance video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *