गेल्या काही महिन्यांपासून स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका टीआरपी मध्ये अग्रेसर असताना दिसून आल्या. उत्तम कथानक असलेल्या स्टार प्रवाह वाहिनींच्या मालिकांनी प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळविले. त्यातच “फुलाला सुगंध मातीचा” ही मालिका टीआरपी मध्ये नेहमीच टॉपला असते. या मालिकेतील शुभम कीर्ती या जोडीमुळे ही मालिका यशस्वी ठरू शकली.

Samruddhi kelkar

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत सध्या कीर्तीला IPS ऑफिसर बनविण्यासाठी शुभम सर्वोपतरी प्रयत्न करताना दिसून येत आहे. परंतु, कीर्ती या गोष्टींसाठी नकार देत मी माझ्या स्वप्नांपासून आता खूप दूर आले असल्याचे म्हणताना दिसते. मालिकेत नेहमीच साडी वर दिसणारी कीर्ती खऱ्या आयुष्यात मात्र खूपच मॉडर्न राहते. तिच्या काही फोटोज् सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत कीर्तीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचे खरे नाव समृध्दी केळकर आहे. समृध्दी ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते व ती तिच्या बऱ्याच बोल्ड फोटोज् पोस्ट करताना दिसून येते . मूळची ठाण्याची असणारी समृध्दी ही अगोदर पासूनच स्टायलिश राहत असते. ती इंस्टाग्राम वर देखील अशाच लुक मध्ये स्वतःच्या रील्स व्हिडिओ पोस्ट करताना दिसून येते.

Samruddhi kelkar
समृध्दी ही अभिनयासोबत ती एक डान्सर देखील आहे. त्यामुळे तिच्या डान्स व्हिडिओना देखील बरेच व्ह्यूज मिळताना दिसतात. सध्या फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभम आईचा विरोध असताना देखील पत्नी कीर्तीचे आयपीएस होण्याचे स्वप्न कसे साकारणार याची उत्सुकता फॅन्सना लागून राहिली आहे.

Samruddhi kelkar

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *