मराठी मालिकांमध्ये बाल कलाकारांचे नेहमीच मोठे योगदान दिसून येत असते. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील “लाडू”, देवमाणूस मालिकेतील “टोण्या”, माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतील “परी” या बाल कलाकारांमुळे मालिकांनी अफाट लोकप्रियता मिळविली. आता स्टार प्रवाह वाहिनीवरील रंग माझा वेगळा मालिकेत 2 चिमुकल्यांचे आगमन होताना दिसणार आहे.

रंग माझा वेगळा मालिकेत दीपा व कार्तिक हे दोघे काही दिवसांपूर्वी 2 मुलींचे आई वडिल झालेले पाहायला मिळाले. या दोघींचे नाव दीपिका व कार्तिकी असे ठेवण्यात आले असून सध्या मालिकेत नवजात बाळ दाखविण्यात येत आहेत. आता मालिकेत मोठा बदल होणार असून मालिकेचे कथानक 8 वर्षाने पुढे जाणार आहे. त्यामुळे या चिमुकल्या आता थोडे मोठे झालेल्या दिसणार आहेत.

मालिकेचा प्रोमो आला असून या प्रोमो मध्ये दिसणाऱ्या 2 चिमुकल्या पैकी एकीचे नाव साईशा भोईर आहे. साईशा ही मूळची कल्याणची असून ती मालिकेत येण्यापूर्वीच सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे. तिचे हजारो फॉलोवर्स असून स्वतःच्या रील्स व्हिडिओ मधून फॅन्सना हसवत असते. तिच्या बऱ्याच व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

 

साईशाची आई पूजा कदम-भोईर या आपल्या लेकीचे व्हिडिओ स्वतः शूट करतात. कॉमेडी व्हिडिओ मध्ये कॅमेरा मागे स्वतः या साईशाला बोलत असतात. आपल्या गोड बोलीने सर्वांना आकर्षित करणारी साईशा आता मालिकेत आपल्या अभिनयाचे जलवे दाखविणार आहे. येत्या 20 तारखेला साईशा मालिकेत पहिल्यांदा दिसणार आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *