2 दिवसापूर्वी अभिनय क्षेत्रातून एक दुःखद घटना ऐकावयास मिळाली. लोकप्रिय टिव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. सिद्धार्थच्या लाखो चाहत्यांसाठी हा एक मोठा धक्काच होता. सिद्धार्थच्या निधनानंतर त्याचे अनेक फोटोज् आणि व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहेत.

Siddhartha Shukla death news

सिद्धार्थ शुक्ला याने त्याच्या अभिनयातील कारकीर्दीत भरभरून यश मिळविले होते. बालिका वधू मालिकेतून सिद्धार्थला स्वतःची खरी ओळख निर्माण करता आली होती. नंतर त्याने खतरों के खिलाडी-7 किताब पटकाविला होता. परंतु, सिद्धार्थच्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण बिग बॉस 13 या शोला जिंकणे हा होता. कारण या शो नंतर त्याचे अगणित फॅन्स तयार झाले होते.

सध्या सिद्धार्थचा धक धक गर्ल माधुरी दीक्षित सोबतचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडिओ मध्ये सिद्धार्थ व माधुरी “राम-लखन” तेरा नाम लिया या गाण्यावरील एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र दिसून येत आहे. कलर्स वाहिनीवरील डान्स दिवाने-3 या शो मध्ये सिद्धार्थ त्याच्या एका वेब सीरिजच्या प्रमोशन साठी गेला होता. त्यामुळे शो ची जज माधुरी दीक्षित सोबत त्याला डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही.

Siddharth shukla and Madhuri dance

 

सिद्धार्थच्या निधनाची वार्ता मिळाल्या नंतर माधुरी दिक्षितला देखील मोठा धक्का बसला होता. “हे अविश्वसनीय आणि धक्कादायक आहे. तू नेहमीच स्मरणात राहशील सिद्धार्थ. तुझ्या आत्म्यास शांती लाभो. कुटुंबाप्रती माझी मनःपूर्वक संवेदना” अशा भावूक शब्दात माधुरीने सिद्धार्थला श्रद्धांजली वाहिली.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *