आज दिनांक 2 सप्टेंबर रोजीची सकाळ उजाडली आणि अभिनय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली. टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे आज निधन झाले. सिद्धार्थच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली असून अनेकांना याचा धक्का बसला आहे. आपल्या हटके स्टाईल मुळे सिद्धार्थने अनेकांची मने जिंकली होती.

Siddharth shukla

बिग बॉस-13 आणि खतरों कें खिलाडी-7 या दोन्ही शो चा विजेता राहिलेल्या सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाची वार्ता ऐकून अजूनही अनेकांना विश्वास बसत नाही. रात्री झोपण्यापूर्वी सिद्धार्थने औषधे घेतली व तो बेडरूम मध्ये झोपण्यास गेला. परंतु, सकाळी दार उघडत नसल्याने त्याची आई व मित्रांनी दरवाजा उघडला असता तो मृत अवस्थेत आढळून आला.

 

सध्या सोशल मीडियावर सर्वच ठिकाणी सिद्धार्थ शुक्लाच्या फोटोज् व व्हिडिओज दिसून येत आहेत. त्यातच आता सुशांतचा शेवटचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हीडिओ मध्ये सिद्धार्थ विमानतळावर त्याच्या आई सोबत दिसून आला होता. तो त्याच्या आईचा खूपच प्रिय होता व त्याने आयुष्यात त्याच्या आईशिवाय कधीच जास्त वेळ काढला नव्हता.

Siddharth shukla

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाबद्दल पोलीस व डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार त्याचे निधन हे हृदय विकाराच्या झटक्याने झाले. पहाटे 3 वाजेच्या सुमारास सिद्धार्थ शुक्लाला हृदयविकाराचा झटका आला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याच्या निधनानंतर त्याची आई व 2 विवाहित मोठ्या बहिणी आहेत.

Siddhartha Shukla death news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published.