अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बॉलिवूड व अन्य क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी या अभिनेत्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सिद्धार्थने त्याच्या आयुष्यात आपल्या अभिनयाच्या जोरावर लाखो फॅन्स कमविले होते. त्या सर्व फॅन्सना ही घटना पचनी न पडणारी आहे.

खतरों के खिलाडी आणि बिग बॉस 13 या शोचा विजेता असणाऱ्या सिद्धार्थ शुक्ला अनेक सेलिब्रिटींच्या जवळचा होता. बिग बॉस 13 मध्ये ज्यावेळी सिद्धार्थने एन्ट्री केली तेंव्हा त्याचे घरातील काही सदस्यांसोबत खूप जवळचे संबंध निर्माण झाले होते. त्यातच त्याचे नाव शेहनाज गिल सोबत जोडले जाऊ लागले होते. सिद-नाज नावाने लोकप्रिय झालेल्या या जोडीला लोकांनी खूप पसंद केले.

काल दिनांक 2 सप्टेंबर रोजी सिद्धार्थच्या निधनाची वार्ता आली आणि सिद-नाज मधील नाते कायमसाठी अपूर्ण राहिले. काल शेहनाज गिलला सिद्धार्थच्या निधनाची बातमी समजताच तिला या घटनेचा पूर्णपणे धक्का बसला आहे. आज अंत्यसंस्कार करण्यासाठी आल्यास देखील शेहनाज पूर्णपणे खचून गेलेली दिसून येत होती.

सिद्धार्थ व शेहनाज या दोघात किती जवळचे नाते होते हे या शेहनाज गिलची अवस्था पाहूनच समजू शकता येते. दोघांनी बिग बॉस 13चे संपूर्ण सीझन गाजविले होते. बिग बॉस संपल्यानंतर देखील या दोघांना अनेक शो मध्ये बोलवण्यात आले होते. त्यामुळे या दोघांना एकत्र पाहून फॅन्सना आनंद मिळायचा. आता ही जोडी परत कधीच एकत्र दिसणार नसल्याने अनेकजण दुःख व्यक्त करीत आहेत.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *