बिग बॉस 13चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे. टेलिव्हिजन क्षेत्रातील अत्यंत नावाजलेला चेहरा म्हणून लोकप्रिय असणाऱ्या या अभिनेत्याच्या निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. एक गुणवान, बलवान, फिटनेस जपणारा अभिनेता गेल्याने याचे कसे निधन झाले हाच प्रश्न सर्वांना पडला आहे.

Siddharth shukla
सिद्धार्थ शुक्ला बुधवारी रात्री त्याच्या आई सोबत घरी जेवण केला. नंतर जेवण केल्यास तो औषध घेऊन रूम मध्ये झोपायला गेला. परंतु, आज गुरुवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी उठलाच नाही. त्यानंतर त्याच्या घरातील लोकांनी त्याला कूपर दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक अंदाजानुसार सिद्धार्थ शुक्ला याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याचे समोर आले आहे. तब्येतीने इतका मजबूत असणारा सिद्धार्थला हृदय विकाराचा झटका कसे आला हा प्रश्न सर्वांना पडला आहे.

 

सिद्धार्थने नक्की कोणती औषधे घेतली होती?, सिद्धार्थच्या रात्री घरी कोण आले होते का?, सिद्धार्थ ने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली? असे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्याकडून करण्यात येत आहेत. अवघ्या 40व्या वर्षात सिद्धार्थने करोडो प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे.

Siddhartha Shukla death news
बाबुल का आंगण या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या सिद्धार्थने बालिका वधू मालिकेतून लोकप्रिय झाला. नंतर त्याने खतरों के खिलाडीचा विजेता देखील झाला होता. परंतु, त्याला सगळ्यात जास्त लोकप्रियता ती बिग बॉस या रिॲलिटी शो मधून मिळाली होती. स्वतःच्या हिमतीवर अभिनय क्षेत्रात नाव कमविनाऱ्या सिद्धार्थने “हम्टी शर्मा की दुल्हनिया” या चित्रपटात दिसून आला होता. अभिनेत्री रश्मी देसाई, शेहनाज गील सोबत याचे नाव चर्चेत होते.

Siddharth shukla
सिद्धार्थला “मर्द मराठी” कडून भावपूर्ण श्रद्धांजली. माहिती आवडली तर शेयर करा.
By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *