संयुक्त राष्ट्र महासभेत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाकिस्तानचा प्रधानमंत्री इम्रान खानने काश्मीर मुद्यावर वादग्रस्त व्यक्तव्य केले. परंतु, भारताने यावेळी देखील इम्रान खानचे तोंड बंद करत जबरदस्त प्रत्युत्तर दिले. या महासभेत भारताची पहिली सचिव स्नेहा दुबे इम्रान खानला उत्तर देण्यासाठी उभी होती. स्नेहा दुबे ने अत्यंत उत्तमरीत्या पाकिस्तानच्या पंतप्रधानाला तोंडावर आपटले.

Sneha dubey inspirational video

स्नेहा दुबे या महासभेत असे म्हणाल्या, “जम्मू काश्मीर आणि लडाख हे भारताचे प्रमुख अंग होते, आहेत आणि कायम राहतील. इथे असे क्षेत्र आहेत, जे अवैधरीत्या पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. आम्ही पाकिस्तानला त्या अवैध ताबा घेतलेल्या क्षेत्रांना ताबडतोब रिकामे आवाहन करीत आहोत.” अशा शब्दात स्नेहा ने पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खानची बोलती बंद केली.

 

पुढे स्नेहा म्हणाल्या, “खूप देशांना ही गोष्ट माहिती आहे की, पाकिस्तान आतंकवाद्यांना मदत करीत असतो व त्यांचे समर्थन देखील करीत असतो. हीच पाकिस्तानची निती आहे. हा असा एक देश आहे जो जागतिक स्तरावर आतंकवाद्यांना आर्थिक मदत करतो, हत्यारे उपलब्ध करून देतो. अमेरिकेत झालेल्या 9/11 हल्याचा मुख्य सूत्रधार असणाऱ्या ओसामा बिन लादेनला आज पण पाकिस्तानात शहीद मानले जाते.”

Sneha dubey inspirational video

पाकिस्तानचा खरा चेहरा संयुक्त राष्ट्र महासभेत समोर आणणारी स्नेहा दुबे नक्की कोण आहे हा प्रश्न सर्वांना पडला आहे. स्नेहा ही 2012 च्या बॅच मधील महिला आईएफएस अधिकारी आहे. अधिकारी बनल्यानंतर तिची नियुक्ती विदेश मंत्रालयात झाली. काही वर्षानंतर तिची नियुक्ती भारताची प्रथम सचिव म्हणून करण्यात आली. स्नेहाचे सुरवातीचे शिक्षण गोव्यात झाले, नंतर दिल्ली येथील जेएनयू युनिव्हर्सिटी मधून शिक्षण घेतले व नंतर पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी मिळवली. स्नेहाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *