गेल्या काही काळात कलाकारांच्या आत्महत्येच्या घटना ऐकावयास मिळाल्या.  (Soujanya actress death news)नैराश्य, करियर मधील अपयश, वाद विवाद या कारणाने काही कलाकारांनी जीवनयात्रा संपविली. सुशांत सिंग राजपूत या अभिनेत्याने देखील असेच जीवन संपविले होते. आता एका अभिनेत्रीने आत्महत्या केली असल्याची घटना समोर आली आहे.

ही धक्कादायक घटना शेजारील राज्य कर्नाटक मधील असून लोकप्रिय कन्नड अभिनेत्री सौजन्या हीने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. सौजन्या ही कन्नड इंडस्ट्री मधील नावाजलेली अभिनेत्री होती. दिनांक 30 सप्टेंबर रोजी सौजन्याने बंगळूरच्या कुंबलगोडू येथील राहत्या घरी पंख्याला लटकून जीवनाचा अंत केला. सौजन्याने आत्महत्या करण्यापूर्वी सूसाईड नोट देखील लिहिली आहे. Soujanya actress death news

Soujanya actress death news
पोलिसांना सापडलेल्या सूसाईड नोट मध्ये सौजन्याने आत्महत्येस कोणासही जबाबदार नसल्याचे म्हटले आहे. तसेच, डिप्रेशन मध्ये असल्याने हा निर्णय घेतला असल्याचे तिने पत्रात लिहिले सौजन्याने आई वडिलांची माफी देखील मागितली आहे. सौजन्याने कन्नड मालिकेप्रमाणेच काही साऊथच्या चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

Soujanya actress death news
गेल्या काही काळापासून सौजन्या ही मानसिक आजाराशी लढत होती. “मी वचन दिले होते की मी अशी चूक कधीच करणार नाही. परंतु, मला आतून वेदना होत असल्याने मी हा कठोर निर्णय घेत असल्याचे सौजन्याने पत्रात लिहिले. तिच्या जाण्याने कन्नड इंडस्ट्रीने एक उत्तम अभिनेत्री गमावली आहे. Soujanya actress death news

सर्वांनी कमेंट मध्ये या अभिनेत्रीला श्रद्धांजली वाहा..

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *