येऊ कशी तशी मी नांदायला ही एकमेव जूनी मालिका झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात येत आहे. बंद झालेल्या मालिकांपेक्षा ही मालिका जास्त लोकप्रिय होती. परंतु, गेल्या आठवड्यात स्वीटूचे लग्न ओम सोबत न लावता मोहित सोबत झालेलं दाखविल्याने फॅन्सच्या पदरी निराशाच पडली. आता या मालिकेत एका लोकप्रिय अभिनेत्री दिसून येणार आहे.

Yeu kashi tashi mi banvayla serial

प्रेक्षकांना स्वीटू व ओम हे परत एकदा एकत्र यावे व त्या दोघांचे लग्न व्हावे असे या मालिकेच्या फॅन्सना वाटते. त्यामुळे आता मालिकेत प्रिया मराठे या अभिनेत्रीच्या येण्याने मालिकेत मोठे फेरबदल झालेले पाहायला मिळणार आहेत. प्रिया मराठे ही मालिकेत एका कंपनीची मालकीण असणार असून तिथे स्वीटू जॉब करताना दिसेल.

 

तसेच, ओम देखील याच कंपनीसोबत काम करताना दिसणार असून प्रिया या दोघांना एकत्र आणताना दिसेल. स्वीटू व मोहितच्या लग्नानंतर हे दोघे शकूच्या घरी राहिलेले दिसून आले. शकूच्या घरी जास्त दिवस न राहणे स्वीटू आवडत नसल्याने व भूतकाळ विसरण्यासाठी स्वीटूने जॉब करण्याचा निर्णय घेतला. प्रोमो नुसार स्वीटूने मुलाखत देऊन प्रिया वर प्रभाव टाकलेला दिसून येत आहे.

Yeu kashi tashi mi nandayla

“मालिकेत माझी व्यक्तिरेखा दिसणार असल्याने मी खुश आहे. प्रेक्षकांचे लाडके ओम व स्वीटू या दोघांना पुन्हा एकत्र आणण्यात माझा मोठा हातभार असेल” असे प्रिया म्हणाली. पवित्र रिश्ता या हिंदी मालिकेतून लोकप्रियता मिळविणाऱ्या प्रियाने नंतर अनेक मराठी चित्रपट व मालिकेत काम केले. नुकतेच ती स्वराज्यरक्षक संभाजी व स्वराज्यजननी जिजामाता या मालिकेत दिसून आली होती.

Yeu kashi tashi mi nandayla

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *