स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका गेल्या काही काळापासून लोकप्रियतेचे शिखर गाठताना दिसून आल्या. “आई कुठे काय करते” ही मालिका देखील त्यापैकीच एक आहे. मागील काही एपिसोड्स पासून ही मालिका प्रेक्षकांना कंटाळवाणी वाटू लागली आहे. कारण, मालिकेतील अनेक गोष्टी प्रेक्षकांना न पटणाऱ्या दाखविण्यात आल्या.

Aai kuthe ky karte

 

अनिरुद्ध व अरुंधती यांचा झालेला घटस्फोट व नंतर अनिरुद्ध व संजनाचे झाले लग्न या गोष्टी प्रेक्षकांना आवडले नसल्याचे दिसून आले. तरीही या मालिकेचा प्रेक्षकवर्ग जराही कमी झालेला दिसून आला नाही. मालिका जरी कंटाळवाणी चालू असतानाच आता या मालिकेत नवीन ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे. मालिकेत एका नवीन अभिनेत्याची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे.

Aai kuthe kay karte serial

आई कुठे काय करते मालिकेत आता समीर धर्माधिकारी या लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा होत आहे. समीरच्या आगमनाने मालिकेत मोठे फेरबदल होताना दिसू शकतात. आई कुठे काय करते ही मालिका “श्रीमोयी” या बेंगाली मालिकेचा रिमेक असल्याने या मालिकेच्या आगामी भागांचा अनुमान लावता येऊ शकतो. समीर हा अरुंधंतीचा कॉलेज काळातील जुना मित्र असतो.

Aai kuthe kay karte serial

एकीकडे अरूंधती व अनिरुद्ध यांच्यात कायमचा दुरावा असताना अरूंधतीच्या जुन्या मित्राच्या येण्याने मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळू शकतो. तो मित्र अरूंधती सोबत लग्न करण्याचा विचार करू शकेल का? हे पाहणे मनोरंजक ठरेल. समीर धर्माधिकारी हे अभिनय क्षेत्रातील खूप नावाजलेले अभिनेते आहेत. त्यांनी अनेक मराठी व हिंदी चित्रपट, मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याने आई कुठे काय करते ही मालिका मनोरंजक होवू शकते.

Aai kuthe kay karte serial
Aai kuthe kay karte serial

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *