सोशल मीडियावर अनेक गाण्यावर डान्स करण्याचा ट्रेंड चालू असतो. ट्रेंडींग गाण्यावर काही नेटकरी कॉपी करताना दिसतात तर काही जण स्वतःच नवीन ट्रेंड सुरू करतात. मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे हीचा देखील एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Abhidnya bhave dance video

“खुलता कळी खुलेना”, “तुला पाहते रे” अशा मराठी मालिकांमधून दिसून आलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर खूप ॲक्टिव असते. गेल्या काही काळात अभिज्ञा अनेक रील्स व्हिडिओ पोस्ट करताना दिसून आली. आता तिने चक्क ट्रॅक सूट घालून “दिसला ग बाई दिसला” या गाण्यावर नाचताना दिसून आली. अभिज्ञाने डान्स जरी सुंदर केला असला तरी या डान्स मध्ये 2 ट्रेंड मिक्स केल्याचे दिसून आले.

अनेक नेटकऱ्याना हा डान्स पाहून हसू आवरले नाही. अभिज्ञाने हा व्हिडिओ पोस्ट करताना असे कॅप्शन टाकले, “रिमिक्स दिसला ग बाई दिसला, 2 एव्हरग्रीन ट्रेंड्स ला मिक्स करण्याचा मी प्रयत्न केला. मीटर मध्ये बसवायच्या नादात थोडी कोरिओग्राफी गंडली.” या व्हिडिओ वर रंग माझा वेगळा मालिकेची अभिनेत्री रेश्मा शिंदे हीने “मी तर म्हणते, हे कमाल आहे” अशी कमेंट केली.

Abhidnya bhave dance video

अभिज्ञा हीची तुला पाहते रे मालिकेतील मायराची भूमिका खूपच गाजली होती. त्यानंतर ती आता पवित्र रिश्ता 2 या मालिकेत दिसून येत आहे. नुकतेच ती विवाहबंधनात देखील अडकली होती. सोशल मीडियावर अशा व्हिडिओ द्वारे नेहमीच फॅन्स चे मनोरंजन करताना दिसते.

Abhidnya bhave dance video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *