काल रात्री आयपीएल-14 ची धूमधडाक्यात सांगता झाली. एकीकडे क्रिकेट फॅन्स जल्लोष व आनंद व्यक्त करीत होते तेच दुसरीकडे भारतीय क्रिकेट मधून दुःखद वार्ता समोर आली आहे. भारताचा अंडर 19 संघाचा माजी कर्णधार आणि 2019- 20 च्या रणजी ट्रॉफी विजेत्या संघाला सदस्य अवी बरोट याचे दुःखद निधन झाले आहे.

Avi barot death news

15 ऑक्टोबरच्या संध्याकाळी 29 वर्षीय अवी बरोट हा त्याच्या राहत्या घरी होता. अचानक त्याला हृदयविकाराचा झटका आला व त्यातच त्याला आपला जीव गमवावा लागला. त्याच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण सौराष्ट्र क्रिकेट व भारतीय क्रिकेटमध्ये शोककळा पसरली आहे. अविने गेल्या काही काळापासून घरेलु क्रिकेट मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे भारताने एक उत्तम क्रिकेटर गमावला आहे.

 

2011 मध्ये अवि बरोटने भारतीय अंडर 19 क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले होते. तसेच, तो हरियाणा व गुजरात या रणजी संघाचा देखील सदस्य राहिला आहे. यावर्षीच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये त्याने चमकदार कामगिरी करताना केवळ 5 सामन्यात 283 धावा केल्या होत्या. तो भारतीय क्रिकेटर चेतन साकरिया व अक्षर पटेल या दोघांचा खूप जवळचा मित्र होता.

“सौराष्ट्र क्रिकेट मधील उल्लेखनीय क्रिकेटपटू अवि बरोट यांच्या अत्यंत धक्कादायक, अकाली निधनाने आम्ही खूप दुःखी आहोत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमधील प्रत्येकजण अवि बरोटच्या अत्यंत दुःखद निधनाबद्दल कुटुंबातील सदस्यांना मनापासून शोक व्यक्त करीत आहोत.” असे सौराष्ट्र क्रिकेट असोसिशनच्याने म्हटले.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *