“तुझ्यात जीव रंगला” मालिकेत नंदिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर ही गेली काही महिने अभिनयापासून दूर होती. तुझ्यात जीव रंगला मालिकेतील धनश्रीची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती. त्या नकारात्मक भूमिका साकारली असली तरी त्या पात्राने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले.

Dhanashree kadgaonkar new serial

तुझ्यात जीव रंगला मालिकेला धनश्रीने गरोदर असल्याने मालिकेतून माघार घेतली होती. त्यानंतर धनश्रीला 28 जानेवारी 2021 रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले होते. त्यानंतर धनश्री संपूर्ण वेळ बाळाला व कुटुंबाला देताना दिसून आली. आता धनश्रीने परत एकदा अभिनय क्षेत्रात पुनरागमन केले असून ती आता वेगळ्या भूमिकेत दिसून येणारं आहे.

झी मराठी वाहिनीवर पौराणिक कथांवर चालू असलेल्या “घेतला वसा टाकू नको” या मालिकेतून धनश्री काडगावकर दिसून येत आहे. या मालिकेत धनश्री दुर्गा मातेच्या भूमिकेत दिसून येत असून ती दुर्गा मातेच्या पेहरावात खूपच सुंदर दिसत आहे. धनश्रीला या मालिकेत काम करण्यासाठी आल्या 8 महिन्याच्या बाळापासून दूर राहावे लागत आहे.

Dhanashree kadgaonkar new serial

मालिकेच्या शूटिंग मुळे बाळापासून दूर राहावे लागत असल्याने धनश्री तिच्या बाळाला खूपच मिस करीत असल्याचे दिसून येत आहे. धनश्रीचे पती दुर्वेश देशमुख यांनी एक पोस्ट करीत धनश्रीला बाळाचा एक संदेश दिला. “प्रिय आई, मला माहिती आहे की तू मला खूप मिस करतेय. माझी काळजी करू नकोस. मी खूप छान आहे. तू खूप काम कर. मी बाबा, आज्जी आजोबा सोबत खेळतो आहे. आय लव यू आई”

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *