सध्या देशभरात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे प्रकरण खूपच चर्चेत आहे. ड्र’ग्सची देवाण घेवाण केल्या प्रकरणी आर्यन खानला नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो(एनसीबी)ने ताब्यात घेतले व तो सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणामुळे एनसीबी अधिकारी समीर वानखेडे चांगलेच चर्चेत आले आहेत.

Kranti redkar reply to trollar

एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर या प्रकरणाचा खूप मोठा दबाव असला तरी त्यांनी न घाबरता हे प्रकरण हाताळले आहे. परंतु, यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना धमक्यांचे फोन येत असल्याचे स्वतः समीर वानखेडे यांनी सांगितले. त्यांची पत्नी लोकप्रिय मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर हिच्या सोशल मीडियावरील पोस्ट वर देखील घाणेरड्या कमेंट्स आलेल्या दिसून येत आहेत.

sameer wankhede kranti

 

क्रांती रेडकरचे पती जरी मोठ्या प्रकरणात व्यस्त असले तरी क्रांती मात्र नेहमीप्रमाणे सोशल मीडियावर साधारण पोस्ट करताना दिसून येते. अशाच एका पोस्ट वर एका नेटकऱ्याने “समीर वानखेडे दल्ला हैं” अशी कमेंट केली. त्यावर क्रांतीने असा रिप्लाय दिला, “तुम्हाला भरपूर सकारात्मकता आणि आनंद पाठवत आहे.” या रिप्लाय मुळे क्रांतीने अनेकांचे मन जिंकले.

Kranti redkar reply to trollar

क्रांती रेडकर कधीच समीर वानखेडे यांच्या कार्याबद्दल बोलताना दिसून येत नाहीत. समीर हे देखील क्रांतीला त्यांच्या कामाबद्दल काहीच सांगत नाहीत, असे स्वतः क्रांतीने बोलून दाखविले होते. आर्यन खान प्रकरणामुळे राजकीय वर्तुळ देखील तितकेच तापले असून राजकीय पक्ष एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसून येत आहेत. तसेच, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी क्रांती रेडकरच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी असल्याचे म्हटले आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *