भारतात असे काही आश्चर्यकारक गोष्टी पाहायला मिळतात, ज्या संपूर्ण जगात शोधून सापडणार नाहीत. आपण यापूर्वीही अनेकदा भारताच्या नावे अनेक रेकॉर्ड असल्याचे पाहिले आहेत. आता एका महाराष्ट्रीयन मुलीच्या नावे भारतातील सर्वात मोठे केस असल्याचा रेकॉर्ड प्रस्थापित झाला आहे. या मुलीच्या केसाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

Long hair girl akanksha

महाराष्ट्राच्या ठाणे येथे राहणाऱ्या आकांक्षा यादव या मुलीचे केस पाहून अनेकजण चकित झाले आहेत. आकांक्षाच्या केसाची लांबी ही तिच्या उंचीपेक्षा जवळपास दुप्पट असल्याचे दिसून येत आहे. तिचे केस तब्बल 9 फूट 10.5 इंच(3.01) लांब असून हा एक राष्ट्रीय रेकॉर्ड आहे. भारतातील सर्वात मोठे केस म्हणून आंकाक्षाच्या केसाची नोंद झाली आहे.

आंकाक्षा यादव हिच्या याच लांबलचक केसांमुळे तिने लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस् 2020-2022 मध्ये आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान मिळविले आहे. हा किर्तीमान स्थापित केल्यानंतर आकांक्षा म्हणाली, “राष्ट्रीय पुरस्कार मिळविणे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. रेकॉर्ड बनविणे हे तर माझ्यासाठी चांगलेच आहे परंतु, त्याने माझ्यातील ऊर्जा आणि आनंद दोन्ही वाढला आहे.”

Long hair girl akanksha
एकीकडे महिलांना छोटे किंवा मध्यम केस सांभाळणे अवघड वाटत असते, तर दुसरीकडे आकांक्षा 10 फूट केसांचा उत्तमरीत्या सांभाळ करते. ती दिवसातून 20 मिनिटांपेक्षा जास्त वेळ तिच्या केसांना देत नाही. तिने तिच्या आयुष्यात फक्त एकदा तिच्या कमेरे पेक्षा कमी केस कापले असल्याचे तिने स्वतः सांगितले. लवकरच आकांक्षा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड देखील प्रस्थापित करू शकते.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *