दिनांक 3 ऑक्टोंबर रोजी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील ज्येष्ठ कलाकार घनश्याम नायक यांचे कॅन्सरमुळे दुःखद निधन झाले. घनश्याम यांनी या मालिकेत नटू काकाची भूमिका साकारली होती. 3 वर्षापूर्वी या मालिकेतून हंसराज हाथी हे पात्र साकारणाऱ्या कवी कुमार आझाद या कलाकाराचे देखील हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले होते.

Nattu kaka heart touching video

गेल्या 13 वर्षापासून “तारक मेहता का उलटा चष्मा” ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आली. ज्येष्ठ अभिनेते घनश्याम नायक हे सुरुवातीपासूनच मालिकेचा महत्त्वाचा भाग होते. त्यांचा अभिनय व बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांना खूप आवडायची. आज त्यांच्या अंत्य संस्कारावेळी त्यांच्या पत्नीचे रडणे पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करीत आहेत.

Nattu kaka death news

घनश्याम नायक यांची पत्नी निर्मलादेवी यांनी तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील बागाची भूमिका साकारणाऱ्या तन्मय वेकारिया याच्या गळ्याला पडून रडताना दिसून आल्या. तन्मय व घनश्याम यांचे खूप जवळचे नाते होते. या दोघांचे मालिकेतील काका पुतण्याचे नये होते. त्यामुळे साहजिकच तन्मय याच्यासाठी देखील ही खूप दुःखद घटना आहे.

 

घनश्याम नायक यांच्या जाण्याने एक गुणी कलाकार हरपला आहे. घनश्याम यांना अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुनमुन दत्ता, असित कुमार मोदी, राज अनाडकत अशा मालिकेतील कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली. मालिकेतील सदस्यांपैकी ते सर्वात जास्त वयस्कर कलाकार होते. परंतु, कॅन्सर मुळे घनश्याम यांनी अखेर वयाच्या 77 व्या वर्षी निरोप घेतला.

Nattu kaka death news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *