सोशल मीडियावर अभिनय क्षेत्रातील अनेक कलाकारांना कोणत्या ना कोणत्या गोष्टी बाबतीत फॅन्सकडून कमेंट केलेलं पाहायला मिळते. परंतु, काही कलाकार अतिशय नम्रपणे फॅन्सना उत्तर देताना दिसून येतात. सध्या मराठी अभिनेते प्रशांत दामले यांना देखील फॅन्सनी अनेक कमेंट्स केले व त्यांना प्रशांत दामले यांनी अतिशय प्रेमळपणे उत्तरे देखील दिली.

 

अभिनेते प्रशांत दामले हे सध्या अभिनयाची आवड असणाऱ्या लोकांना अभिनयाचे धडे देताना दिसून येत आहेत. त्यांनी अभिनयाची कार्यशाळा “टी स्कूल” नामक क्लासेस सुरू केले असून त्यात ते अभिनय, नृत्य, गायन असे धडे देत आहेत. आज त्याच कार्यशाळे बद्दलची एक पोस्ट प्रशांत यांनी पोस्ट केली. त्यावर एका युझरने “टुकार मराठी मालिका कधी बंद होतील ते बघा” अशी कमेंट केली. या कमेंटला प्रशांत दामले यांनी गमतीशीररित्या उत्तर दिले.

Prashant damle news

” मालिका बघणे बंद केले की(बंद होतील मालिका)” अशा शब्दात प्रशांत दामले यांनी त्या युझरला उत्तर दिले. साहजिकच जी मालिका आवडत नसेल ती प्रेक्षकांनी पहिली नाही तर मालिकेचा टीआरपी उतरून ती मालिका बंद होणारच. प्रशांत दामले हे नेहमीच त्यांच्या फॅन्सना नम्रपणे बोलताना दिसून येतात. यावेळी देखील त्यांनी तेच केलं. आणखीन एका युझरने “करमणुकीच्या नावाखाली जो फालतूपणा सुरू आहे, त्यातून सगळ्यांना बाहेर काढा प्रशांतजी” अशी कमेंट केली.

Prashant damle news

त्यावर प्रशांत यांनी अतिशय उत्तमरीत्या उत्तर दिले. ते म्हणाले, “रसिकांना खळखळून हसवण्यासाठी मी खुप मेहनत आहे. मी नाटकाची जवळ जवळ 40 दिवस तालीम करतो, त्यामुळे त्यातील चुका कळतात. लेखकांबरोबर दिग्दर्शकला चर्चा करून त्यात सुधारणा करता येते. प्रयोगगणिक संहितेत आणि सादरीकरणात सुधारणा करता येते. सीरिअल मध्ये हे शक्य होत नाही. तिथे काळ काम वेगाच गणित असत. त्यामुळे काही वेळा तुम्ही म्हणता तसा रटालपणा येऊ शकतो. घाईघाईने सगळ कराव लागत. म्हणून काही सिरीयल फसतात. सिरीयल मध्ये काम करण हा एक वेगळा चॅलेंज आहे. विषय मोठ्ठा आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे.”

Prashant damle news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *