आज दिनांक 29 ऑक्टोबर 2021 रोजी साऊथ चित्रपट सृष्टीमधून एक दुःखद घटना समोर आली. कन्नड चित्रपट क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेता सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे दुःखद निधन झाले आहे. पुनीत राजकुमार यांना आप्पू या नावाने देखील ओळखले जायचे. त्यांच्या निधनाने सर्वत्र एकच शोककळा पसरली आहे.

Punit rajkumar last video

पुनीत यांच्या निधनानंतर सर्वत्र शोककळा पसरली असून सोशल मीडियावर सर्वत्र त्यांचेच फोटोज् व व्हिडिओज व्हायरल होताना दिसून येत आहे. पुनीत राजकुमार हे आज सकाळी बंगळूर येथील एका जिम मध्ये वर्कआऊट करीत होते. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले व तिथेच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना विक्रम हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले व साऊथ इंडस्ट्रीने हिरा गमावला.

46 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारे अभिनेते पुनीत यांच्या निधनापूर्वीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसून येत आहे. हा व्हिडिओ पुनीत यांच्या निधनाच्या 2 दिवसापूर्वीचा असून बजरंगी 2 या चित्रपटाच्या प्रमोशन वेळीचा हा व्हिडिओ आहे. या प्रमोशनच्या कार्यक्रमात पुनीत हे KGF स्टार यश याच्या सोबत धमाल करताना दिसून येत आहेत. या व्हिडिओ मद्ये ते खूप खुश दिसून येत होते.

Punit rajkumar

पुनीत हे उत्तम अभिनेते तर होतेच, पण त्यासोबतच ते एक चांगले समाजसेवक देखील होते. त्यांनी त्यांच्या आयुष्यात 26 अनाथ आश्रम, 45 उच्च शाळा, 16 वृद्ध आश्रम, 19 गोशाळा, 1800 मुलांचे संपूर्ण शिक्षण, आणि मैसूर मध्ये शक्ती धाम नावाने लहान मुलींचे शिक्षण व्यवस्था इतके पुण्याचे काम केले होते. तसेच, त्यांनी जिवंतपणी नेत्रदान केले होते व मृत्युपश्चात त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाले आहे.

Punit Rajkumar

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *