क्रिकेट खेळाडूंचे अभिनेत्रींसोबत असणाऱ्या अफेयरच्या बातम्या आपण अनेकदा ऐकत असतो. गेल्या काही महिन्यांपासून भारतीय क्रिकेटचा नवा तारा ऋतुराज गायकवाड याचे देखील नाव अशाच गोष्टी साठी चर्चेत आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री सायली संजीव हिचे नाव ऋतुराज सोबत जोडले जात आहे.

Sayali sanjiv new video

मूळचा पिंपरी चिंचवड येथे राहणारा ऋतुराज गायकवाड याने आयपीएल मध्ये चेन्नई सुपर किंग संघाकडून खेळताना चमकदार कामगिरी केली. सीएसके च्या विजयात ऋतुराज चा मोलाचा वाटा होता. ऋतुराजने सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्ट वर अभिनेत्री सायली संजीव हीने हार्ट पोस्ट केले आणि ऋतुराजने देखील त्यावर तसाच रिप्लाय दिला. तेंव्हापासूनच या दोघांच्या प्रेमाबद्दल चर्चा होवू लागल्या.

अभिनेत्री सायली संजीव देखील ने टाकलेल्या प्रत्येक पोस्ट ऋतुराजच्या फॅन्सकडून याच बाबतीत कमेंट येताना दिसून येतात. आता सायलीने पोस्ट केलेला एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमुळे युवा पिढीला आकर्षित केले आहे. एका फोटो सेशन दरम्यान सायलीने एक व्हिडिओ शूट केला असून तिने छाप तिलक या गाण्यावर रिल्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओ मध्ये सायली खूपच सुंदर दिसत आहे.

“काहे दिया परदेस” या झी मराठी वरील सीरियल मधून लोकप्रियता मिळविणारी सायली नुकतीच शुभमंगल ऑनलाईन या मालिकेत दिसून आली होती. गेल्या काही काळापासून ती सोशल मीडियावर खूपच ॲक्टीव राहत असून तिच्या अनेक फोटोज् व व्हिडिओज पोस्ट करीत असते. ऋतुराज सोबत तिचे काय नाते आहे हे दोघे येणाऱ्या काळात स्पष्ट करतीलच.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *