शुभमंगल ऑनलाईन मालिकेतील अभिनेता सुयश टिळक या अभिनेत्याचा विवाह सोहळा आज दिनांक 21 ऑक्टोबर रोजी पार पडला. युवा डान्सिंग क्वीन मध्ये दिसून आलेली अभिनेत्री आयुषी भावे हिच्यासोबत सुयशचा विवाहसोहळा पार पडला. दोघांचा विवाह पुण्यात मोजक्याच नातेवाईकांच्या व काही कलाकारांच्या उपस्थितीत पार पडला.

Suyash tilak marriage videos

7 जुलै 2021 रोजी सुयश व आयुषी यांचा साखरपुडा झाला होता. आयुषीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यावेळी दोघांनी साखरपुडा केला होता. तेंव्हा पासून दोघांचा विवाह कधी होईल याबद्दल फॅन्सकडून चर्चा करण्यात येत होती. आज तो मुहूर्त आला व दोघांचा विवाहसोहळा पार उत्साहात पार पडला. दोघेही लग्नाच्या पेहरावात खूपच सुंदर दिसत होते.

Suyash tilak marriage videos

मागील काही दिवसांपासून विवाहपूर्वीच्या सर्व समारंभाचे फोटोज् व व्हिडिओज व्हायरल होत होते. संगीत, हळदी, मेहंदी अशा सर्वच कार्यक्रमाचे फोटोज् व व्हिडिओज व्हायरल होत होते. संगीत सोहळ्यातील सुयश व आयुषीचे डान्स व्हिडिओ समोर आले आहेत. किती सांगायचं मला, मन धागा धागा या गाण्यावर दोघांनी रोमँटिक डान्स केलेला दिसून आला.

 

लग्न समारंभात सावनी रवींद्र, सुकन्या मोने, हर्षदा खानविलकर, गौतमी देशपांडे असे काही कलाकार उपस्थित होते. दोघांना सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. सुयश टिळक व आयुषी भावे यांना वैवाहिक आयुष्यासाठी “मर्द मराठी” टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *