झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेतील यश नेहा व परी यांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. आज आपण या मालिकेत नेहाच्या वहिनीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री बद्दल जाणून घेऊयात. ती अभिनेत्री खऱ्या आयुष्यात कोणाची पत्नी आहे, हे देखील जाणून घेऊयात.

Swati deol husband name

 

माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत नेहाच्या म्हणजेच प्रार्थना बेहरेच्या वहिनीची भूमिका स्वाती देवल या अभिनेत्रीने साकारली आहे. मीनाक्षी हे नकारात्मक पात्र स्वाती उत्तमरित्या साकारताना दिसून येत आहे. खूप कमी लोकांना माहिती आहे की स्वाती हीचा खऱ्या आयुष्यातील पती हा चला हवा येऊ द्या शो मधील एक कलाकार आहे.

Swati deol husband name

झी मराठी वाहिनीवरील “चला हवा येऊ द्या” या कॉमेडी शो ने यशाची अनेक शिखरे गाठली. या शोमधील संगीतकार तुषार देवल हाच स्वातीचा पती आहे. चला हवा येऊ द्या शो मध्ये डॉ. निलेश साबळे अधून मधून तुषार देवल वर कॉमेडी करताना दिसत असतो. तुषार देवल सुद्धा कधी कधी जोक करताना दिसत असतो. तुषार व स्वाती या दोघांना एक मुलगा देखील आहे.

Swati deol husband name

 

स्वाती देवल हिने झी मराठीच्या 2010 मधील फुबाईफु या शो मध्ये सहभाग नोंदविला होता. त्यात तिने अभिनेता संदीप पाठक सोबत काम केले होते. विशेष म्हणजे या शो चे निलेश साबळे यांनी सूत्रसंचालन केले होते. स्वातीने कळत नकळत, कुंकू, वादळवाट, विवाहबंधन, पुढचं पाऊल, पारिजात अशा अनेक मालिकांमध्ये उत्तम अभिनय केला आहे. तसेच तिने “वन टू का फोर” या नाटकात देखील उत्तम अभिनय केला आहे.

Swati deol husband name

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *