अनेक मराठी चित्रपटातून अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्या विरोधात त्याच्या पत्नीने फिर्याद दाखल केली आहे. प्रेमविवाह केलेल्या अनिकेत साठी ही एक धक्कादायक गोष्ट आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिकेतची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाण हिने अनिकेत वर गंभीर स्वरूपाचे आरोप लावले आहेत.

Aniket vishwas rao news

अनिकेत विश्वासराव व स्नेहा चव्हाण या दोघांचा 2018 मध्ये विवाह झाला होता. दोघांमध्ये लग्नाच्या काही काळानंतरच वाद-विवाद होण्यास सुरुवात झाली. स्नेहाने कोथरुड येथे दाखल केलेल्या फिर्यादीनुसार अनिकेतने तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. तसेच, अनिकेतचे बाहेर अनैतिक संबंध होते व करिअरमध्ये आपल्यापेक्षा पत्नी पुढे जाईल या भीतीने अनिकेत स्नेहाला मारहाण करीत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Aniket vishwas rao news

तसेच, अनिकेत स्नेहाला हाताने मारहाण करून लोकांसमोर अपमानास्पद वागणूक द्यायचा. स्नेहाने अनिकेतच्या आई-वडिलांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. स्नेहाने दाखल केलेल्या फिर्यादी नंतर अनिकेतने देखील याबाबतीत स्पष्टीकरण देताना सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Aniket vishwas rao news

अनिकेत म्हणाला, “स्नेहाला माझ्यापासून विभक्‍त व्हायचं होतं. विभक्त होण्यासाठी स्नेहाने माझ्याकडे 25 लाखाची पोटगी मागितली होती. परंतु मी ते देण्यास नकार दिला होता. स्नेहा 5 फेब्रुवारी 2021 पासून तिच्या माहेरी राहायला गेली. गेली दहा महिने ती गप्प का राहिली? तिने आजचा दिवस निवडला, कारण आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे. मुद्दामहून स्नेहा व तिच्या कुटुंबीयांनी आम्हाला मानसिक त्रास देण्यासाठी केलेले हे एक षड्यंत्र आहे.”

Aniket vishwas rao news

माहिती कशी वाटली ते कमेंट करुन कळवा व शेअर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *