स्टार प्रवाह वाहिनीवरील “सहकुटुंब सहपरिवार” ही मालिका गेल्या काही काळापासून टीआरपी मध्ये टॉपला आहे. या मालिकेला महाराष्ट्रातील घराघरातून लोकप्रियता मिळाली. या मालिकेतील सर्वच पात्रांनी आपापली ओळख निर्माण केली आहे. मात्र आता या मालिकेबाबतीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या मालिकेत सूर्याच्या आईची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेचे निर्माते व अन्य काही सहकलाकारां विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

Annapurna vitthal viral video
अन्नपूर्णा विठ्ठल यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यात त्यांनी गंभीर आरोप करताना दिसून येत आहेत. त्या म्हणाल्या, “या मालिकेचे निर्माते आणि काही सह कलाकार हे मला मानसिक त्रास देत गेले. तसेच, त्यांच्याकडून माझे रॅगिंग करण्यात आले,” असे धक्कादायक आरोप त्यांनी केले आहेत. व्हिडिओ द्वारे त्यांनी किती त्रास झाला हे बोलून दाखविले आहे.

अन्नपूर्णा विठ्ठल या पुढे म्हणाल्या, “मराठी अभिनय क्षेत्रात अमराठी कलाकारांना टिकू दिले जात नाही. मी सहकुटुंब सहपरिवार ही मालिका गेल्या महिन्यात सोडली. परंतु, मला मालिकेतून बाहेर काढण्यात आले अशी अफवा पसरवण्यात आली. मला मानसिक त्रास देणे, रॅगिंग करणे या गोष्टींमध्ये सुनिल बर्वे, नंदिता पाटकर, किशोरी आंबिये आणि दिग्दर्शकामध्ये भरत गायकवाड, विठ्ठल डाकवे यांचा सहभाग होता. सुनिल बर्वे हा इतका मोठा अभिनेता असून त्यांनीही मला सुरुवातीपासूनच त्रास दिला. तसेच, नंदिता पाटकर आणि किशोरी आंबिये या दोघींनीही मला प्रचंड त्रास दिला.”

“दिग्दर्शक भरत गायकवाड हे अनेकदा मला म्हातारी म्हणून आवाज द्यायचे. तसेच, त्यांनी मला अश्लील शिवीगाळ देखील केली आहे. मराठी कला क्षेत्र तुमचं आहे का? जर अमराठी लोकांनी जर मराठी कलाक्षेत्रात काम करू नये अशी जर तुमची मानसिकता असेल तर अशा लोकांनी हिंदी तेलगू सिनेमात काम करू नये,” असे देखील त्या पुढे म्हणाल्या.

Annapurna vitthal viral video

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *