झी मराठी वाहिनीवर “रात्रीस खेळ चाले” या मालिकेचे सध्या तिसरे पर्व सुरू आहे. मालिकेतील सर्वच पात्रांनी आप आपली छाप पाडली आहे. दुसऱ्या पर्वात अण्णा नाईक व शेवंता हे दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. परंतु आता या मालिकेच्या सेटवर ऊन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Apurva nemlekar latest news

“रात्रीस खेळ चाले-2” ही मालिका यशाच्या शिखरावर पोहचविण्यात मालिकेतील शेवंताचे मोठे योगदान होते. शेवंता हे पात्र अपूर्वा नेमलेकर या अभिनेत्रीने साकारले होते. परंतु, अपूर्वाने आता मालिका सोडली असून तिने काही धक्कादायक खुलासे केले आहेत. अपूर्वा नेमलेकर ने सोशल मीडियावर पोस्ट करीत तिला तिच्या जाडपणामुळे विडंबण केले असल्याचे म्हटले आहे.

Apurva nemlekar latest news

अपूर्वा म्हणाली, “शेवंता या भूमिकेसाठी मी 10 किलो वजन वाढवलं होतं. वजन वाढल्यावर काही नकारात्मक कमेंटचा मी सामना करीत आले. परंतु, सेटवर काम करताना काही नवख्या आणि काही ज्येष्ठ कलाकारांनी विनाकारण या वाढलेल्या वजनावर माझे विडंबन केले. उघडपणे माझी खिल्ली उडवली गेली. त्यातील काही कमेंट्स जाणीवपूर्वक करण्यात आल्या. त्याबद्दल वरिष्ठांनी त्यावर कारवाई केल्यानंतर ही संबंधित नवख्या कलाकारांनी साधी दिलगिरी सुद्धा व्यक्त केली नाही.”

पुढे शेवंता म्हणाली, “तिसऱ्या सीझनमध्ये मला पाच ते सहा दिवस शूटिंग करावी लागणार असे सांगितल्यानंतर मी मालिकेला नकार दिला होता. परंतु चॅनेलने मला आणखीन एक शो देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु पाच ते सहा महिने झालं, अद्याप ते आश्वासन पाळले गेले नाही व त्याच कारणाने माझ्या आर्थिक नुकसान झालं. मी अत्यंत प्रामाणिकपणे चॅनेलची एकनिष्ठ राहून काम केलं परंतु माझ्या कष्टाचा मोबदला मला मिळत नसेल तर व नवख्या कलाकारांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने मी या शो मध्ये नं राहण्याचा निर्णय घेतला.”

Apurva nemlekar latest news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *