देवाने सर्वांना इतके सुंदर आयुष्य दिले आहे. तरी विचार न करता आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात. प्रत्येकाच्या जीवनात समस्या व नैराश्य यांचे असणे साहजिकच आहे. परंतु, भैय्यू महाराज यांच्या सारख्या लोकप्रिय व्यक्तीने आत्महत्या करणे हे अनेकांना अचंबित करणारे होते. त्यांच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.

Bhaiyyu maharaj news update

राष्ट्रसंत ओळख असणारे प.पु. भय्यू महाराज हे आपल्या अध्यात्माद्वारे लोकांना निराशेतून बाहेर काढण्यासाठी प्रवचन देत असायचे. 12 जुन 2018 रोजी भय्यू महाराजांनी राहत्या घरी आत्महत्या केल्याचे उघड झाले आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. भैय्यू महाराजांनी स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली होती. त्यावेळी प्राथमिक अंदाजानुसार भैय्यू महाराजांनी काही व्यक्तींच्या दबावामुळे स्वतःला गोळी झाडून घेतल्याचे समोर आले होते. परंतु, आता या प्रकरणात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Bhaiyyu maharaj news update

या प्रकरणाच्या सहा महिन्यांनी त्यांचे सेवेकरी विनायक दुधाळे, शरद देशमुख व त्यांची केअरटेकर पलक पुरानिक यांच्यावर पैशासाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप दाखल करण्यात आला. आता केअरटेकर पलक पुराणिक बद्दल एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. पलकने महाराजांना अश्लील व्हिडिओ शेयर करण्याची धमकी देऊन लाखो पैसे लुबाडल्याची माहिती समोर आली आहे.

Bhaiyyu maharaj news update

भोपाळच्या फॉरेन्सिक टीमने 109 पानाचे वॉट्सॲप चाट कोर्टात सादर केले आहे. ज्यामध्ये पलक भैय्यू महाराजांना ब्लॅकमेल करीत असल्याचे दिसून आली. तसेच, पीयुष जिजू नावाच्या एका व्यक्ती बरोबर संभाषण करताना काही महत्वाच्या गोष्टी त्यातून उघड झाल्या आहेत. त्यामुळे भैय्यू महाराजांच्या आत्महत्येस पलक ही जबाबदार असण्याची शक्यता आहे.

Bhaiyyu maharaj news update

माहिती आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *