झी मराठी वाहिनीवरील काही काळापूर्वी येऊन गेलेल्या काही मालिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते. तुला पाहते रे देवमाणूस, दिल दोस्ती दुनियादारी या या मालिका काहीच काळ चालल्या. परंतु, या मालिकांनी टीआरपीचे अनेक रेकॉर्ड मोडून काढले. आता याच मालिक ईबिके एक मालिका परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Dev manus 2 serial news latest

काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलेल्या “देवमाणूस” या मालिकेला अफाट लोकप्रियता मिळाली होती. सत्य घटनेवर आधारित असल्याने ही मालिका कथेप्रमाणेच दाखविण्यात आली व त्यामुळेच ही मालिका लवकर संपवावी लागली. परंतु, या मालिकेला प्रेक्षकांकडून भेटलेले प्रेम पाहता मालिकेच्या टीमने “देवमाणूस”चा दुसरा भाग काढण्याचे ठरवले. आता मालिकेचा एक प्रोमो देखील आला आहे.

देव माणूस मालिकेच्या पहिल्या भागात अभिनेता किरण गायकवाड यांनी देवी सिंगची उर्फ डॉ. अजितकुमार देव ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती. मालिकेच्या शेवटी देवी सिंग जिवंत असल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे आता दुसऱ्या सिझन मध्ये नेमके कसे कथानक असेल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Dev manus 2 serial news latest

देवी सिंगची भागीदार डिंपल ही देखील सर्व पैसे घेऊन पळून जाताना दिसून आली होती. त्यामुळे ती कुठे गेली व पुढे हिरोईन बनणार का याची उत्तरे नवीन मालिकेत पाहायला मिळतील. तसेच, नवीन मालिकेत टोण्या, सरू आज्जी असे काही जुने कलाकार देखील दिसून येणार आहेत. देवमाणूस-2 ही मालिका येत्या काही दिवसातच जुन्या वेळी प्रमाणे 10.30 वाजता प्रदर्शित करण्यात येईल. “ती परत आलीय” ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याची शक्यता आहे. तसेच, तुला पाहते रे मालिकेचा दुसरा भाग येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *