झी मराठी वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी येऊन गेलेल्या “देवमाणूस” या मालिकेने अफाट लोकप्रियता मिळवली. 15 ऑगस्ट रोजी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, मालिकेच्या शेवटी काही गोष्टी प्रेक्षकांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या होत्या. ज्यात मालिकेतील मुख्य पात्र अजित कुमार देव उर्फ देवी सिंग हा जिवंत असल्याचे पाहायला मिळाले. त्यावरून मालिकेचा दुसरा भाग येणार हे नक्की झाले होते.

देवमाणूस 2 या मालिकेचा आता प्रोमो आला असून आता ही नवीन मालिका कोणत्या रूपात हे पाहणे मनोरंजक ठरेल. देवमाणूस मालिकेच्या पहिल्या भागात अभिनेता किरण गायकवाड यांनी देवी सिंगची उर्फ डॉ. अजितकुमार देव ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती. प्रोमो नुसार डॉ. ची लावलेली पाटी खाली पाडलेली दिसून येत आहे. त्यामुळे देवी सिंग आता एका नवीन रुपात पाहता येणार असल्याची शक्यता आहे.

Dev manus 2 story
म्हणजेच, मालिकेच्या दुसऱ्या पर्वात देवी सिंग लोकांना वेड्यात काढण्याची शक्यता आहे. तसेच, नवीन मालिकेत टोण्या, सरू आज्जी, डिंपल, बाबू, मंगल, बज्या, नाम्या हे जुने पात्र देखील दिसून येणार आहेत. त्यामुळे पहिल्या भागा प्रमाणेच मालिका मनोरंजक असणार आहे.

Dev manus 2 story
देवी सिंगची भागीदार डिंपल ही देखील सर्व पैसे घेऊन पळून जाताना दिसून आली होती. आता ती दुसऱ्या भागात हिरोईन झालेली पाहायला मिळू शकते व ती यावेळी देखील डॉक्टर ची भागीदार असू शकते. पहिल्या भागात मालिकेने अनेक टीआरपीचे रेकॉर्ड मोडले. आता ही देखील मालिका तितकीच लोकप्रियता मिळवेल का हे पाहणे मनोरंजक ठरेल.

Dev manus 2 story
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *