सध्या झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या “मन उडू उडू झालं” मालिकेने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या मालिकेतील दिपू व इंद्रा या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसून येत आहे. दोघांची मालिकेतील केमेस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. मालिकेत दिपूची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऋता दुर्गुले हीने तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

Hruta durgule boyfriend news
मन उडू उडू झालं मालिकेत इंद्रा दिपू समोर आपल्या प्रेमाची कबुली कधी देतो याची प्रेक्षकवर्ग वाट पाहत होते. मालिकेच्या नवीन प्रोमो मध्ये इंद्रा दिपूला आपल्या प्रेमाची कबुली देत असल्याचे दिसून येत आहे. परंतु खऱ्या आयुष्यात स्वतः ऋताने आपल्या जोडीदाराबद्दल उघड केले आहे. सोशल मीडिया वर एक पोस्ट करताना ऋताने तिच्या प्रियकरासोबतची एक फोटो पोस्ट केली आहे.

चित्रपट व मालिकेचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रतीक शाह याच्या सोबत ऋता रिलेशनशीप मध्ये आहे. “मला तुझ्यात अशी आशा सापडली आहे जी मला कधीच माहीत नव्हती” हृता व प्रतीक हे दोघे गेल्या काही काळापासून रिलेशन मद्ये असल्याचे समजते. महाराष्ट्रातील लाखो युवकांची आकर्षण ठरलेली ऋता अखेर कोणाच्या तरी प्रेमात पडली आहे.

Hruta durgule boyfriend news
प्रतीक याने बेहद 2, तेरी मेरी इक जिंदरी, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दीवाना था, मनमोहनी अशा काही लोकप्रिय चित्रपट व मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. फुलपाखरू मालिकेतून फेमस झालेली ऋता येत्या काही काळात लग्नबंधनात अडकणार असल्याचे समजते. प्रेमाची कबुली देत आज ऋताने फॅन्सना सुखद धक्का दिला आहे.

Hruta durgule boyfriend news
माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *