हिंगोली येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका नर्सचे दुर्दैवी निधन झाले आहे. ज्योती गवळी नामक नर्सचे प्रसुती दरम्यानच दुःखद निधन झाले आहे. ज्योती गवळी नर्सने त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत तब्बल ५ हजार महिलांची यशस्वीरीत्या प्रसूती केली होती. परंतु, शेवटी त्यांनाच प्रसुती वेळीच जीव गमवावा लागल्याने सोबतच्या सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

Jyoti gawali nurse death news

ज्योती गवळी या गेल्या पाच वर्षांपासून हिंगोलीच्या एका सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांनी त्या काळात जवळपास ५ हजार महिलांची यशस्वी प्रसुती केली. प्रसुतीची वेळ आल्याने 2 नोव्हेंबर रोजी ज्योती यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्योती यांनी शस्त्रक्रिया करून प्रसूती करण्यात आली व त्यांनी बाळाला जन्म दिला. परंतु, प्रसूती नंतर ज्योती यांचे रक्त मोठ्या प्रमाणात गेल्याने त्यांची प्रकृती खूपच खालावली.

Jyoti gawali nurse death news

प्रकृती खालवल्यामुळे ज्योती यांना नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. ज्योती यांच्या तब्येतीत सुधारणा होईल असे वाटत असतानाच त्यांचा डॉक्टरानी दुःखद बातमी दिली. आम्ही ज्योतीला वाचवू शकलो नसल्याचे डॉक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. त्या अगोदर डॉक्टरांनी ज्योतीला औरंगाबादला नेण्यास सांगितले होते, परंतु त्यापूर्वीच ज्योतीची प्राणज्योत मावळली.

Jyoti gawali nurse death news

ज्योतीने जन्म दिलेले बाळ सुखरुप असून डॉक्टरांनी त्या बाळाला नातेवाईकाकडे सुपूर्त केले. आपल्या कामात ज्योती खूपच निपुण होती व सर्व पेशंटचे नातेवाईक तिचे भरभरून कौतुक करायचे. ज्योतीच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली असून, एक गुणी नर्स गमावल्यानं दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *