गेल्या काही काळात काही मराठी सेलिब्रिटींच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झालेले आपण पाहिलं. बॉलिवूड सोबतच
काही मराठी कलाकारांच्या घरातून देखील बाळाची बातमी ऐकावयास मिळाली. शशांक केतकर, धनश्री काडगावकर, संकर्षण कऱ्हाडे या काही कलाकारांना पालकत्व प्राप्त झाले. आता या यादीत आणखीन एका मराठी अभिनय क्षेत्रातील जोडप्याची भर पडली आहे.

Khushboo tawade news

काही वर्षांपूर्वी गाजलेल्या देवयानी मालिकेतून प्रसिध्दी मिळविणारा अभिनेता संग्राम साळवी व त्याची पत्नी अभिनेत्री खुशबू तावडे यांनी आज पोस्ट करीत फॅन्सना बाळाचे आगमन झाले असल्याचे सांगितले. काल संग्राम व खुशबू या दोघांनी हि आनंदाची बातमी फॅन्स सोबत शेयर केली. दिवाळी मध्येच या दोघांना पुत्र रत्न प्राप्त झाले आहे.

 

संग्राम व खुशबू या दोघांचा विवाह 5 मार्च 2018 रोजी झाला होता. दोघांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी मुलगा झाला असून त्यांनी बाळाचे नाव “राघव” ठेवले आहे. “आम्हा दोघांना निवडण्यासाठी, धन्यवाद” अशा शब्दात बाळाचे आभार मानले. बाळाची आनंदाची बातमी शेयर करताच या दोघांना मराठी कलाकारांकडून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Khushboo tawade news

“आम्ही दोघी” या मराठी मालिकेत दिसून आलेल्या अभिनेत्री खुशबू तावडे हीने नंतर तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेत काम केले होते. त्या मालिकेत पोपटलालच्या आयुष्यात येऊन गेलेल्या बुलबुलचे पात्र तिने साकारली होती. तसेच संग्राम साळवी याने देवयानी मालिकेसोबत सरस्वती सारख्या काही मालिकेत काम केले आहे. या दोघांना “मर्द मराठी” टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा.

Khushboo tawade news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *