गेल्या काही काळापासून अभिनय क्षेत्रातील आणि पीकच कलाकारांनी जगाचा निरोप घेतल्याचे ऐकावयास मिळाले. आता मराठी अभिनय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर आली आली. अनेक मराठी व हिंदी मालिकांमधून काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे दुःखद निधन झाल्याची वार्ता समोर आली आहे.

Madhavi gogate death news

ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे यांचे रविवारी दिनांक 21 नोव्हेंबर 2021 रोजी दुपारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कोरोनाची लागण झाली होती व त्या मुंबई येथील सेव्हन हील या रुग्णालयात उपचार घेत होत्या. रविवारी त्यांची प्रकृती बिघडली व त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.

Madhavi gogate death news

वयाच्या 58 व्या वर्षीच जगाचा निरोप घेतलेल्या माधवी यांनी अनेक मराठी मालिका व हिंदी मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. अनुपमा या हिंदी मालिकेतील अनुपमाच्या आईची साकारलेली भूमिका खूप गाजली होती. मिसेस तेंडुलकर, कोई अपना सा, ऐसा कभी सोचा न था, एक सफर, बसेरा अशा त्यांच्या गाजलेल्या हिंदी मालिका होत्या.

Madhavi gogate

 

स्वप्नांच्या पलीकडले, तुझं माझं जमतंय, डोक्याला ताप नाही या मराठी मालिकांमधून देखील त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. घनचक्कर चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. तसेच, त्यांनी प्रशांत दामले यांच्या सोबत “गेला माधव कुणीकडे” हे नाटक केले होते. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून प्रशांत दामले यांनी भावूक पोस्ट केली आहे.

Madhavi

 

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *