टेलिव्हिजन क्षेत्रातील सर्वात लोकप्रिय मालिकांपैकी एक असणारी “आई कुठे काय करते” ही मालिका नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. या मालिकेत सध्या नवीन वळण आलेले पाहायला मिळत आहे. घर गहाण ठेवण्याच्या प्रकरणामुळे अरुंधती ही आता एकटी पडलेली दिसून आली. गेल्या काही भागांमध्ये अरुंधती स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळणार आहे.

अरुंधती हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडले आहे. या पात्र अभिनेत्री मधुराणी प्रभुळकर हीने साकारले आहे. मधुराणी मालिकेत जरी साधारण दिसत असली तरी ती खऱ्या आयुष्यात खूपच मॉडर्न असते. त्यामुळे तिचा मॉडर्न लुक मालिकेत पण पाहायला मिळावा अशी फॅन्सची इच्छा होती. आता स्वतः अरुंधतीने मालिकेत तिचा मॉडर्न लुक पाहायला मिळणार का याबद्दल एक पोस्ट करून स्पष्टीकरण दिले आहे.

 

मधुराणीने वरील फोटो पोस्ट करीत असे म्हटले, “हा आहे अरुंधतीचा नवीन लुक, अशा अफवांवर विश्वास ठेवू नका.” यापूर्वीही सोशल मीडियावर बऱ्याचदा अरूंधतीचा लुक बदलणार, अशा अफवा पसरल्या होत्या. त्याबद्दलच अरूंधतीने स्पष्टीकरण देताना अशा अफवांवर विश्वास ठेवू नका असे सांगितले आहे. त्यामुळे अरुंधती ही मालिकेत आहे त्याच लुक मध्ये दिसणार आहे.

Madhurani prabhulkar new

तसेच, मालिकेत अरुंधतीच्या एका जुन्या मित्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार असून यासाठी समीर धर्माधिकारी यांच्या नावाची चर्चा सुरू होती. परंतु, ही एक अफवा असून ओमकार गोवर्धन हा अभिनेता आता मालिकेत दिसणार आहे. ओमकार गोवर्धन हा अधीर मन झाले या लोकप्रिय गाण्यात व अनेक मालिकेत दिसून आला होता.

Madhurani prabhulkar new

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *