काही दिवसांपूर्वी वर्षा दांदले या अभिनेत्रीचा मोठा अपघात झाला होता. हा अपघात खूप मोठा होता व त्यात वर्षा यांच्या पाठीच्या मणक्याला खूप त्रास झाला होता. आता झी मराठी वाहिनीवरील “मन उडू उडू झालं” मालिकेचा मुख्य अभिनेत्याचा देखील असाच मोठा अपघात झाला असल्याची बातमी समोर आली आहे.

 

“मन उडू उडू झालं” या मालिकेत अभिनेत्याच्या भूमिकेत अजिंक्य राऊत तर अभिनेत्रीच्या भूमिकेत ऋता दुर्गुळे हे कलाकार दिसून येत आहेत. दिवाळीपूर्वी या मालिकेची शूटिंग बंद झाल्यानंतर सर्व कलाकार आपापल्या गावी जाण्यासाठी निघाले. मन उडू उडू झालं मालिकेत इंद्रची भूमिका साकारणारा अभिनेता अजिंक्य राऊत हा देखील त्याच्या गावी म्हणजेच परभणीला निघाला होता. परंतु, वाटेत त्याचा मोठा अपघात झाला.

या मोठ्या अपघातात अजिंक्य व त्याचे मित्र थोडक्यात वाचले आहेत. स्वतः अजिंक्यने अपघातानंतर व्हिडिओ शूट करून या घडलेल्या प्रसंगाबद्दल सांगितले. आमचा आत्ता अपघात झाला व आम्ही थोडक्यात बचावलो आहे. आमच्या गाडीची स्पीड कमी असल्याने आम्ही गाडी कंट्रोल करू शकलो. सुदैवाने दरी असणारा रोड नव्हता. आमची गाडी खांबावर आदळणार होती त्यामुळे मित्राने गाडी वळवायला पाहिली. परंतु ती गाडी रोडच्या खाली घसरली” असे अजिंक्य म्हणाला.

Man udu udu zal actor news

“देवाच्या कृपेने आम्ही वाचलो व आम्हाला ही दिवाळी बघता आली. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मी दिवाळीला गावी जात होतो, तेंव्हा हा अपघात घडला. यातून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की कुठलाच अवार्ड कुठलेच मेडल काहीच नाही वाटत जेंव्हा जीवघेणा प्रसंग डोळ्या समोर येतो. तुम्ही सर्वजण काळजी घ्या” असे पुढे अजिंक्य म्हणाला. त्याने कॅप्शन मध्ये असेही लिहिले की अपघातावेळी तो गाडी चालवत नव्हता.

Man udu udu zal actor news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *