झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील परीचे पात्र साकारणाऱ्या चिमुकलीने लाखो प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तिच्या निरागस बोली व हावभावावर अनेकजण भुलून गेले आहेत. इतक्या कमी वयात ही बाल कलाकार अभिनयात इतकी परिपक्व कशी आहे, असाच प्रश्न सर्वांना पडतो. परीची भूमिका साकारणाऱ्या मायरा वायकुल याच चिमुकलीच्या आयुष्यात एक दुःखद घटना घडली आहे.

Mayra relatives death news
गेल्या काही दिवसांपासून मायराच्या सोशल मीडियावर अकाऊंट वर एकही पोस्ट दिसत नव्हती. परंतु आता त्यामागचे सत्य कारण समोर आले आहे. 26 ऑक्टोबर 2021 रोजी मायराच्या आजोबांचे दुःखद निधन झाले आहे. मायराच्या आईचे ते वडील होते. मायरा व तिच्या आईसाठी ही खूपच दुःखद घटना आहे. काल मायराच्या आई ने एक भावनिक पोस्ट करून या बद्दल माहिती दिली.

“पप्पा तुमच्यामुळे मला ही दुनिया कळाली. तुमच्यामुळे मी आयुष्याची अनेक वळणे पाहिली. माझी साथ तुम्ही कधीच सोडली नाही. आज का सोडून गेलात. मायराचे कौतुक जेंव्हा तुमच्या डोळ्यात दिसले तेंव्हा मला खूप प्रसन्न वाटले होते. तिचं कौतुक अनुभवायला तुम्ही आणखीन का थांबला नाहीत. तुमचा प्रत्येक गुण माझ्या मायरा मध्ये आहे याचा मला खूप अभिमान आहे. प्रत्येक क्षणाला तुमची आठवण येते पप्पा. तुमची कायम आठवण येत राहील” अशी भावनिक पोस्ट मायराची आई श्वेता वायकुल यांनी केली.

Mayra relatives death news
तसेच, मायराच्या इंस्टाग्राम अकाऊंट वर मायरा आणि तिच्या आजोबांचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओ मधून मायराला तिचे आजोबा किती प्रेम करायचे हे दिसून येत आहे. “सर्वात अविस्मरणीय क्षण म्हणजे आजोबांबरोबर घालवलेले क्षण” असे कॅप्शन देखील या व्हिडिओ सोबत टाकण्यात आले आहे.

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *