मराठी कलाकारांच्या घरी गेल्या काही काळापासून छोट्या पाहुण्याचे आगमन झालेले आपण पाहिलं. शशांक केतकर, धनश्री काडगावकर, संकर्षण कऱ्हाडे, खुशबू तावडे या काही कलाकारांच्या घरी बाळाचे आगमन झाले. आता या यादीत आणखीन एका मराठी अभिनेत्रीचे नाव दाखल होणार आहे.

Ruchi savarn news

“फतेशिकस्त” या गाजलेल्या मराठी चित्रपटात दिसून आलेली अभिनेत्री रुची सुवर्ण व अभिनेता अंकित मोहन या जोडीच्या घरी लवकरच पाळणा हलणार आहे. रूची ही सोशल मीडियावर खूपच ॲक्टिव असते. तिने गेल्या काही दिवसांपासून तिचे बेबी बंप सोबतचे फोटोज् पोस्ट करताना दिसून आली आहे.

Ruchi savarn news

रूची सवर्ण व अंकित मोहन या दोघांचा विवाह 2 डिसेंबर 2015 रोजी झाला होता. 6 वर्षानंतर या दोघांना बाळ होणार असल्याने दोघे खूप आनंदात आहेत. गणेश चतुर्थीच्या वेळी रूचीने सर्वप्रथम ही आनंदाची बातमी फॅन्स समोर शेयर केली होती. येत्या काही दिवसातच रूची व अंकित या दोघांना बाळ होवू शकते. काही दिवसांपूर्वी रूचीचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील पार पडलेला पाहायला मिळाला.

Ruchi savarn news
रूची सवर्णने मराठी मालिकेसोबतच हिंदी मालिकेत देखील काम केले आहे. फतेशिकस्त नंतर रुचीचा पावनखिंड हा चित्रपट येत्या 31 डिसेंबरला प्रदशित होणार आहे. कुंडली भाग्य, घर आजा परदेसी कुंकुम भाग्य, या काही गाजलेल्या हिंदी मालिकेत रुचीने उत्तम भूमिका साकारल्या आहेत. अंकित मोहन याने देखील अनेक मालिका व चित्रपटात काम केले आहे.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *