झी टिव्ही वाहिनीवरील सारेगमप या गायनाच्या शो मध्ये नव्या पर्वात एकापेक्षा एक सिंगर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. 28 नोव्हेंबर 2020 पासून सुरू झालेल्या 12 व्या सीझन मध्ये आत्तापर्यंत थक्क करणारे ऑडिशन पाहायला मिळत आहेत. यात काही नवीन चेहऱ्यासोबतच जुने चेहरे देखील सहभागी झालेले दिसून येत आहेत.

Sanjana bhatt singer news

आता या नव्या पर्वात अशाच एका सिंगरने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या सिंगरचे नाव संजना भट्ट आहे. अनेक राज्यातून अनेक गायक आपल्यातील टॅलेंट प्रेक्षकांसमोर दाखविले. त्यातच दिल्ली येथून आलेल्या संजनाने परीक्षकांसोबत प्रेक्षकांना देखील प्रभावित केले. तिच्या गायनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

संजना ही विवाहित असून ती तिच्या छोट्याश्या बाळाला व नवऱ्यासोबत ऑडिशन द्यायला सारेगमपच्या मंचावर पोहचली. पती देवेंद्र भट्ट सोबत ती तिच्या 14 जणांच्या कुटुंबात छोट्याश्या घरात राहायची. ती स्टेज वर आल्यास अनेकांना वाटले नव्हते की ती सुंदर गाऊ शकेल. परंतु, संजनाने बाळाला घेऊन “आओ तुम्हे चांद पे ले जाये” हे गाणे खूपच सुंदररित्या गायले.

Sanjana bhatt singer news

संजनाचे गाणे ऐकून प्रशिक्षक शंकर महादेवन, हिमेश रेशमिया, विशाल दादलानी हे तिघेही चकित झाले. संजनाने ऑडिशन राऊंड तर जिंकलाच. परंतु, त्याच बरोबर तिने टॉप 16 मध्ये देखील स्थान मिळविले आहे. लग्नानंतर गायनात पुढे जाण्यासाठी मदत केल्याबद्दल संजनाने तिच्या पतीचे आभार मानले.

Sanjana bhatt singer news

माहिती कशी वाटली ते कमेंट करून कळवा व शेयर करायला विसरू नका.


By admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *